Friday, May 16, 2025
Homeब्रेकिंग न्यूजWalmik Karad: "आपल्याला २४ तास एक मदतनीस मिळावा"…; वाल्मिक कराडचा अर्ज न्यायालयाने...

Walmik Karad: “आपल्याला २४ तास एक मदतनीस मिळावा”…; वाल्मिक कराडचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

बीड | Beed
बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित असलेल्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला CID कडून अटक करण्यात आली आहे. केज येथे खंडणी प्रकरणातील आरोपानंतर कराडे याचे नाव संतोष देशमुख प्रकरणातील हत्येचा सूत्रधार म्हणून चर्चेत आले होते. याप्रकरणी वाल्मिक कराडला १४ दिवसांची CID कोठडी सुनावण्यात आली. त्यामध्ये त्याने आपल्याला एक स्लीप ॲप्निया नावाचा आजार असून त्यासाठी आपल्याला एक मदतनीस मिळावा अशी मागणी या याचिकेतून केली होती. वाल्मिक कराडने आपल्यासाठी मदतनीस कोण असावा, याचे नावही कोर्टाला दिले आहे. परंतू, वाल्मिक कराडचा हा मागणी अर्ज केज न्यायलयाने फेटाळल्याची माहिती समोर येत आहे.

- Advertisement -

बीड हत्या प्रकरणी वाल्मिक कराडने न्यायालयात याचिका दाखल केली असल्याची माहिती होती. वाल्मिक कराडने आपल्याला स्लीप ॲप्निया नावाचा आजार असल्याचा दावा केला आहे. आजारासाठी ऑटो सीपॅप नावाची मशीन विशिष्ट दाबाने वापरण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. ही मशीन चालवण्यासाठी आपल्याला सीआयडी कोठडीत 24 तास मदतनीस देण्यात यावा, अशी विनंती वाल्मिक कराडने केली आहे. वाल्मिक कराडने रोहित कांबळे या मदतनीसाची मागणी केली आहे.

वाल्मिक कराडच्या मागणी अर्जानंतर केज जिल्हा व सत्र न्यायालयाने सीआयडीला शासकीय वैद्यकीय सुविधा पुरविण्याचे सुचवले होते. परंतू, याप्रकरणी शुक्रवार ३ जानेवारी रोजी केज न्यायालयात सुनावणी झाली असून, हा मागणी अर्ज फेटाळण्यात आला.

बीड मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात दररोज नवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणी प्रकरणी वाल्मिक कराड अटकेत आहे. देशमुखांची हत्या करणारे आरोपी कराडशी संबंधित आहेत. त्यामुळे कराडच या हत्येचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप होत आहे. सीआयडीने वाल्मिक कराडचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्याची बँक खाती गोठवण्यात आली. तर, संपत्ती जप्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.

अखेर वाल्मिक कराडने स्वत: हून पुण्यात सीआयडी समोर सरेंडर केले.त्यानंतर त्याची रवानगी १५ दिवसाच्या CID कोठडीत करण्यात आली आहे. त्यानंतर आता वाल्मिक कराडची सीआयडीकडून चौकशी सुरू आहे. या दरम्यान त्याने मागणी केली असल्याची माहिती समोर आली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

ट्रकची दुचाकीला धडक; पती-पत्नीचा मृत्यू

0
मालेगाव । प्रतिनिधी Malegaon भरधाव वेगात जाणार्‍या मालट्रकने पाठीमागून दुचाकीस धडक दिल्याने दुचाकीवरून जाणारे दाम्पत्य ठार झाले. मालेगाव-सटाणा रस्त्यावरील लखमापूर नजीकच्या चिंचावड फाट्याजवळ हा अपघात...