करंजी |वार्ताहर| Karnaji
पाथर्डी व नगर (Pathardi-Nagar) तालुक्यातील 12 गावांतील 32 पाझर तलावांचा (Pond) समावेश असलेल्या वांबोरी चारी (Wambori Canal) टप्पा दोनला लवकरच मंजुरी (Approval) देऊन महिनाभरात टेंडर निविदा प्रक्रिया राबवून या योजनेचा प्रश्न कायमस्वरूपीचा मार्गी लावू, असे आश्वासन जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Water Resources Minister Jayant Patil) यांनी मुंबईत पार पडलेल्या बैठकीत दिले.
मंत्री पाटील (Water Resources Minister Jayant Patil) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीस राहुरी (Rahuri), नगर (Nagar), पाथर्डी मतदार संघाचे (Pathardi constituency) लोकप्रतिनिधी व राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Minister of State Prajakt Tanpure) व लाभधारक गावांतील प्रमुख कार्यकर्त्यांची अधिकार्यांसोबत मुंबईत बैठक (Mumbai Meeting) पार पडली. यावेळी मंत्री पाटील म्हणाले, पाथर्डी व नगर तालुक्यातील दुष्काळी गावांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार्या वांबोरी चारी (Wambori Canal) टप्पा दोनचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तुमचे लोकप्रतिनिधी मंत्री तनपुरे यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहेत. लवकरच या योजनेला मंजुरी देऊन टेंडर प्रक्रिया राबवली जाणार आहे. 98 कोटी रुपये यासाठी खर्च करून ही योजना राबविली जाणार आहे. या योजनेच्या अंतर्गत साडेतीन हजार एकर क्षेत्र प्रत्यक्ष ओलिताखाली येणार आहे. त्याचबरोबर मुळा धरण (Mula Dam) ते उदरमलपर्यंत (Udarmal) 38 किलो मीटर मुख्य पाईपलाईनसाठी 620 एमएम साईजचे लोखंडी पाईप वापरले जाणार आहेत.
या योजनेसाठी मुळा धरणामध्ये (Mula Dam) शंभर एमसीएफटी पाणी राखीव ठेवले जाणार असून 1 हजार150 एचपीच्या इलेक्ट्रिक मोटारीद्वारे हे पाणी मुळा धरणातून (Mula Dam) उचलले जाणार असल्याची माहिती राज्यमंत्री तनपुरे (Minister of State Prajakta Tanpure) यांनी दिली. वांबोरी चारी टप्पा दोनमध्ये नगर तालुक्यातील आव्हाडवाडी, उदलमल तर पाथर्डी तालुक्यातील कोल्हार, चिचोंडी, डमाळवाडी, गितेवाडी, डोंगरवाडी, लोहसर, पवळवाडी, वैजूबाभळगाव, भोसे, दगडवाडी करंजी या गावांचा समावेश आहे. या बैठकीस माजी सभापती संभाजी पालवे, करंजी गावचे उपसरपंच भाऊसाहेब क्षेत्रे, डमाळवाडीचे सरपंच रामनाथ शिरसाठ, बबनराव गुंजाळ, युवानेते जालिंदर वामन, विजय पालवे, अशोक टेमकर, उपसरपंच संदीप साळवे, तुळशीराम शिंदे, राजू मरकड, सतीश क्षेत्रे,आदिनाथ डमाळे, शैलेश डमाळे, प्रतीक घोरपडे आदी उपस्थित होते.
राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या प्रयत्नामुळे मंत्रालयात वांबोरी चारी टप्पा दोनसाठी महत्त्वाची बैठक झाल्याने या योजनेच्या कामाला खर्या अर्थाने गती मिळणार आहे. तसेच या योजनेत असलेल्या लाभधारक गावांतील शेतकर्यांना फळबागांसाठी टँकरने विकतचे पाणी घेण्याची गरज कधीच पडणार नाही. या भागातील दुष्काळ कायमचा हाटणार असल्याचा विश्वास माजी सभापती संभाजी पालवे यांनी यानिमित्ताने व्यक्त केला.