Monday, November 25, 2024
Homeमनोरंजनकंगनाचा विमानतळावर समाचार घेऊ

कंगनाचा विमानतळावर समाचार घेऊ

मुंबई | Mumbai –

बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावतशी आपले व्यक्तिगत भांडण नाही. मात्र, तिने मुंबईची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी केली असून हा महाराष्ट्राचा, मुंबईचा अपमान आहे. मुंबईला पाकिस्तान म्हणणे हे कृत्य

- Advertisement -

अत्यंत गंभीर आहे. कंगनाला 9 सप्टेंबरला मुंबईत येऊ द्या, विमानतळावर तिचा शिवसेना शैलीत समाचार घेतला जाईल, असा थेट इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हा इशारा दिला.

ते म्हणाले, शिवरायांच्या महाराष्ट्रावर एखादी व्यक्ती अशा प्रकारे घाणेरड्या शब्दांत टिप्पणी करीत असेल तर हा एका पक्षाचा विषय नाही. 11 कोटी जनतेचा विषय आहे. कंगनाला मराठी समजते का? तिने स्वत:चे ट्विटर हॅण्डल स्वत: हाताळावे. कोणा राजकीय पक्षाच्या आयटी चमूला देण्याची काय गरज आहे, असेही राऊत यावेळी म्हणाले.

कंगनाने मुंबईला अक्कल शिकवायची गरज नाही, असे भाजपा नेते आशिष शेलार म्हणाले खरे. मात्र, त्यांनी हे जरा अधिक जोरात बोलण्याची आवश्यकता होती. हा महाराष्ट्र त्यांचा सुद्धा आहे, अशा शब्दात राऊत यांनी भाजपाला टोला लगावला. हे आंदोलन केवळ शिवसेनेचे नाही. शुक्रवारच्या आंदोलनात सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. पोस्टरवर मते मागायला शिवाजी महाराज नसतात. तसेच कंगनाला महाराष्ट्रात राहाण्याचा अधिकार नाही, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील म्हटले आहे, याकडेही राऊत यांनी लक्ष वेधले.

समाजमाध्यमांवर आक्रमक मोहीम

दरम्यान, कंगनाविरोधात शिवसेनेने समाजमाध्यम मंचावर आक्रमक मोहीम सुरू केली आहे. शिवसेनेकडून वेगवेगळे आक्रमक पत्रके तयार केले असून ते समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात आले आहेत. त्यामुळे आता हे प्रकरण अधिकच तापले आहे. महाविकास आघाडी सरकार या प्रकरणी 9 सप्टेंबरला कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या