Saturday, May 18, 2024
Homeजळगाववारी पंढरीची, वैष्णवांचा मेळा..!

वारी पंढरीची, वैष्णवांचा मेळा..!

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

वारी पंढरीची…वैष्णवांचा मेळा… (Wari Pandharichi … Vaishnava fair).मुखी हरी नाम….भाळी चंदनाचा टिळा (Mukhi Hari Naam …. Bhali Chandanacha Tila)…. असा विठू नामाचा गजर (Vithu Nama’s alarm) करीत जळगाव नगरीचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थान (Gramdaivat Shriram Mandir Sansthan) रामपेठ संचलित श्री संतमुक्ताबाई राम पालखीचे (Shri Sant Muktabai Ram Palkhi) मंगळवारी श्री क्षेत्र पंढरपूर (Shri Kshetra Pandharpur) येथे आषाढी यात्रेकरिता प्रस्थान (departure) झाले. सदगुरू आप्पा महाराज समाधी मंदिरात (Sadguru Appa Maharaj in Samadhi Temple) पालखीचे पूजन (Palkhi Pujan) होऊन दुपारी शिरसोलीकडे प्रस्थान झाले. पालखीसोबत वारकर्‍यांसह भाविकांचा टाळ-मृदुगाांच्या गजरात संत मुक्ताबार्ईसह विठू नामाच्या गजराने भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.

- Advertisement -

श्री संत मुक्ताबार्ई पालखीचे ((Shri Sant Muktabai Ram Palkhi)) जुन्या जळगांवातील श्रीराम मंदिर येथे कुमारिका मुलींच्या हस्ते पूजन (Worship at the hands of girls) करण्यात आले. त्यानंतर भोईटे गढी, कोल्हेवाडा, तळेलेवाडा मार्गे गोपाळपुर्‍यातील श्री सदगुरू बाबजी महाराज समाधी येथे अभंग, आरती होवून विठ्ठल मंदिर, बाहेरपुरा, तरुण कुढापा चौक, पंत नगर, जोशी पेठ मार्गे अप्पा महाराज समाधी मंदिरात (Sadguru Appa Maharaj in Samadhi Temple) भजन, आरती होऊन पालखीचा मुक्काम रात्री श्री सदगुरू अप्पा महाराज समाधी मंदिर येथे होता.

येथूनच मंगळवारी सकाळी 8 वाजता श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान करण्यात आले आहे. पहाटे प्रभू श्रीराम, श्री संत मुक्ताबाईच्या पादुका व श्री सदगुरू अप्पा महाराज यांचे समाधीचे पूजन, अर्चन, आरती होऊन सकाळी 7.30 वाजता पालखीस माल्यार्पण व वारकरी मंडळीस प्रवासास पायी वारीसाठी सज्ज झाले होते.

वारकर्‍यांच्या फुगडीने आनंदाला उधाण

तब्बल दोन वर्षानंतर वारीला परवानगी देण्यात आली. त्यामुळे वारकर्‍यांमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण आहे. मंगळवारी राम पालखीच्या प्रस्थान मार्गात वारकर्‍यांनी फुगडी खेळून (Warakaris playing fugdi) हा भक्तीमय आंनद लुटला.

पालखीचे नेतृत्व हभप मंगेश महाराजांकडे

संत मुक्ताबार्ई पालखीचे नेतृत्व (Palkhi leadership) वंशपरंपरेने श्री संत अप्पा महाराजांचे पाचवे वंशज (Fifth descendant of Shri Sant Appa Maharaj) व विद्यमान गादीपती (present Gadipati HBP Mangesh Maharaj) ह.भ.प.मंगेश महाराज करीत असून सोबत नंदू शुक्ल गुरूजी, अरूण धर्माधिकारी, दत्तुबुवा मिस्तरी, श्रीराम जोशी, पोपट महाजन, सुपडू तेली चोपदार, सखाराम महाराज न्हावी, दिलीप कोळी, खंडू तांबट, बापू महाराज पाटील, निंबा जगताप यांच्यासह प्रवचनकार व किर्तनकार मंडळी सहभागी झाले होते. या पालखीसोबत महाराष्ट्र शासनातर्फे जळगाव जिल्हा परिषदतर्फे वारकरी मंडळींच्या आरोग्य सुविधेसाठी प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही वैद्यकीय पथक, जीप गाडीही सोबतीला आहे.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानतर्फे पालखीवर पुष्पवृष्टी

श्रीराम मुक्ताई पालखीचे पांडे चौकात आगमन होताच श्री शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानतर्फे या संघटनेच्या जळगाव विभागातर्फे धारकर्‍यांनी पालखीवर पुष्पवृष्टी (Flowering) करीत स्वागत केले. यावेळी हभप मंगेश महाराज यांच्याहस्ते शिवछत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे व धर्मज्वालेचे पुजन केले. यावेळी कपिल ठाकूर, रजत वाणी, विशाल जगदाळे, दीपक दाभाडे, आकाश फडे यांच्यासह धारकरी उपस्थित होते. ज्येष्ठ धारकरी शरद पवार यांनी सपत्नीक महाराजांचे पुजन केले.

श्री संत मुक्ताबाई राम पालखीचे उद्या प्रस्थान

जैन उद्योग समूहातर्फे पालखी पूजन

ज्ञानोबा, तुकोबा व मुक्ताईंच्या नामघोषात पालखीचे सकाळी 8 वाजता पंढरीकडे प्रस्थान झाले. त्यापूर्वी पालखी कंवरराम चौक, पंचमुखी हनुमान मंदिर, सिंधी कॉलनी, डी मार्ट मार्गे मेहरूण शिवारातील शिवाजी उद्यानाजवळील श्री संत मुक्ताई पादुका मंदिर येथे दुपारी 11 वाजता पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. मंगेश महाराज, जैन उद्योग समूहाचे (Jain Industries Group) अध्यक्ष अशोक जैन यांच्याहस्ते श्री संत मुक्ताईंच्या पादुकांना माल्यार्पण होवून पालखी शिरसोलीकडे मार्गस्थ झाली आहे. या पालखी सोहळ्यात वारकर्‍यांसह भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या