Tuesday, May 21, 2024
Homeजळगावजिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा

जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा

जळगाव – jalgaon

जिल्ह्यात २४ नोव्हेंबर ते २ डिसेंबर, २०२३ या कालावधी दरम्यान मध्यम ते हलका स्वरुपाच्या पावसाचा हवामान अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या दरम्यान आपल्या पिकांची व शेती पिकांच्या उत्पादनांची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

- Advertisement -

जिल्हयातील पावसाची शक्यता असल्याने काढणी केलेल्या पिकांची जसे कापूस, मका, ज्वारी इत्यादी सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. तसेच उघड्यावरील धान्य योग्यरित्या झाकून ठेवावे, पावसापूर्वी शक्य झाल्यास कापूस बोडांची वेचणी पूर्ण करावी व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचे कीड व रोगासंदर्भात नियमित सर्वेक्षण करुन जर प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्यावर असल्यास विविध योग्य त्या उपाययोजना कराव्यात, हवामान अंदाजावर आधारीत कृषी सल्ला व हवामानाचा पूर्वानुमानाकरीता मेघदुत मोबाईल ॲपचा वापर करावा, तसेच शेतकरी बंधूंनी मेघगर्जना व विजेचा पूर्वानुमानाकरीता दामिनी मोबाईल ॲपचा वापर करावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या