धुळे । dhule । प्रतिनिधी
शहरात घनकचरा संकलन (Solid waste collection) व वाहतूकीसाठी ठेका (contract) देण्यात आलेल्या वॉटरग्रेस प्रॉडक्टस (Watergrace Products) या कंपनीवर महापालिकेने (municipal corporation) दंडात्मक (Penal action) कारवाई केली आहे. सदर कंपनीच्या ताब्यात असलेल्या नादुरुस्त वाहनांचा (Cost of defective vehicles) खर्च या कंपनीकडून वसुल (Recovery) करण्यात येणार आहे.
सोनगीरनजीक लाखाची देशी दारु जप्तन्यायालयाचा अवमान : तत्कालीन पोलीस अधीक्षकांंसह उपअधीक्षक, पोलीस निरीक्षकांना नोटीस
महापालिकेतर्फे दोन वर्षापुर्वी शहरातील कचरा संकलन व वाहतूक करण्यासाठी नाशिक येथील वॉटरग्रेस प्रॉडक्टस या कंपनीला तीन वर्षासाठी ठेका देण्यात आला होता. परंतू ठेकेदाराने बेजबाबदार काम केल्याबाबत तक्रारी करण्यात आल्या. त्यामुळे त्या कंपनीकडून काम बंद करुन नव्याने ठेका देण्यात आला आहे.
मनाेरंजन: दीपिका सर्कसमधुन लावणार ४४० ला करंट : पहा टिझर बालिकेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करणार्यास सात वर्षांची शिक्षा120 ग्रामपंचायतीसाठी 2362 उमेदवार रिंगणातVISUAL STORY : पहा काळजाचा टोका चुकणारा पिळगावकरांच्या श्रियाचा हा कॅज्युअल हटके अंदाज
वॉटरग्रेसला कचरा संकलन करण्यासाठी दहा मोठ्या मॅटॅडोअर 407 व एक झुला गाडी देण्यात आली होती. त्या वाहनांचे कंपनीने कुठल्याही प्रकारची देखभाल न करता अथवा दुरुस्ती न करता शहराच्या विविध ठिकाणी नादुरुस्त अवस्थेत बेवारस पडल्या होत्या. उपायुक्त विजय सनेर यांनी वाहनांची दखल घेवून त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देवून सर्व गाड्या दुरुस्तीसाठी देण्यात आल्या आहेत. या वाहनांचा दुरुस्तीचा खर्च वॉटरग्रेसकडून वसुल करण्यात येणार आहे.
सदर कारवाई उपायुक्त विजय सनेर, कार्यालय प्रमुख राजेंद्र माईनकर, मुख्य स्वच्छता निरिक्षक राजेश वसावे, लक्ष्मण पाटील, वाहन विभागप्रमुख सुक्राम राऊत, विकास साळवे, गजानन चौधरी, महेंद्र ठाकरे, मनिष आघाव, शुभम केदार यांची पथकाने केली.
काँग्रेसचे गड असलेल्या व्यारा व निझर मतदार संघात भाजपाला यशगुंगीचे औषध पाजून तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न