Wednesday, May 22, 2024
Homeदेश विदेशअभियंत्याच्या घरात पैशांची खाण; नोटा मोजून अधिकाऱ्यांनाही फुटला घाम, पाहा VIDEO

अभियंत्याच्या घरात पैशांची खाण; नोटा मोजून अधिकाऱ्यांनाही फुटला घाम, पाहा VIDEO

दिल्ली | Delhi

बिहारच्या ग्रामीण बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याच्या घरातून कोट्यवधींची रोकड जप्त करण्यात आली आहे.

- Advertisement -

किशनगंजमध्ये कार्यरत असलेल्या अभियंता संजय कुमार रायशी संबंधित मालमत्तांवर धाडी टाकण्यात आल्या आहेत. उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती गोळा केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली.

यावेळी घरातून सुमारे ५ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. नोटांची मोजणी सुरू आहे. घरातून एवढ्या मोठ्या प्रमाणात नोटा आल्याचे पाहून निगराणी पथकातील अधिकाऱ्यांनाही धक्का बसला.

- Advertisment -

ताज्या बातम्या