Saturday, May 4, 2024
HomeनाशिकVideo : बगळ्या बगळ्या कवडी दे 'हरणगाव'ची नवरी दे...; 'पाहा' देशदूतचा खास...

Video : बगळ्या बगळ्या कवडी दे ‘हरणगाव’ची नवरी दे…; ‘पाहा’ देशदूतचा खास ग्राऊंड रिपोर्ट

नाशिक | Nashik

पेठ तालुक्यात (Peth Taluka) हरणगाव (Harangaon) हे गाव आहे. आपण सर्वांनी लहानपणी ‘बगळ्या बगळ्या कवडी दे हरणगावची नवरी दे, हरणगाव जळाला नवरदेव नवरी घेऊन पळाला’ हे गाण ऐकले असेल. हे गाण हरणगाव या गावावरूनच तयार झाले आहे. हरणगावला कलाकारांचे (Artists) किंवा कलेचे गाव (Village of Art) म्हणून ओळखले जाते…

- Advertisement -

‘बगळ्या बगळ्या कवडी दे हरणगावची नवरी दे, हरणगाव जळाला नवरदेव नवरी घेऊन पळाला’ हे गाण गेल्या कित्येक वर्षांपासून प्रचलित आहे. या गावातील व्यक्ती सांगतात की, संध्याकाळी गावाच्या बाजूने काही बगळे (Herons) जातांना दिसत. तेव्हा गावातील काही तरुण (Youth)बगळ्या बगळ्या कवडी दे… हे गाण म्हणायचे आणि कवडी हातावर पडून हरणगावची नवरी मिळायची अशी त्याकाळातील श्रद्धा असायची.

तसेच हरणगावाला कलाकारांचे गाव म्हणूनही ओळखले जाते. या गावात पूर्वी पर्वत नाईक आणि खंडू-बंडूचा तमाशा होता. या तमाशांच्या कलेच्या माध्यमातून करमणुकीचे साधन निर्माण व्हायचे. परंतु २०१० नंतर गावातील पिढी उच्चशिक्षित होऊन वेगवेगळ्या क्षेत्राकडे वळल्याने कला मागे पडली आहे.

दरम्यान, याशिवाय हरणगावात एक विजयस्तंभ (Victory Column) असून त्याची विशेष आख्यायिका (Legend)आहे. हा विजयस्तंभ यादवांच्या काळातील असून त्याची उंची २५ फुट असल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या