मुंबई । Mumbai
श्रीलंकेत सुरु असलेल्या लंका प्रीमियर लीग 2023 (Lanka Premier League) चा शुभारंभ 30 जुलैपासून झाला. दुसऱ्याच दिवशी (31 जुलै) लीगमधील सामना गाले ग्लेडियेटर्स आणि दांबुल जायंट्स (GT vs DA) यांच्यात खेळला जात होता.
दरम्यान, मैदानावर एक हटके घटना घडली. क्रिकेट सामना सुरु असतानाच मैदानावर भलादांडगा साफ दिसला. मैदानावर साप आल्याने सामना काही काळ थांबवावा लागला. मात्र, थोड्या वेळातच साप मैदानातून बाजूला गेला आणि सामना पुन्हा सुरु झाला. या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दाम्बुला संघ दुसऱ्या डावात फलंदाजी करत असताना ही घटना घडली आहे. कुसल परेरा आणि धनंजय डिसिल्वा क्रीजवर होते. दुसऱ्या डावातील चौथ्या षटकाचा खेळ संपला, त्याचवेळी सीमारेषेजवळ अचानक साप दिसला. त्यावेळी बांगलादेशचा स्टार अष्टपैलू खेळाडू शाबिक-अल-हसन गोलंदाजी करत होता, त्याने पहिल्यांदा साप पाहिला. भारतीय संघाचा यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने या घटनेवर बांगलादेशी क्रिकेटपटूंची मजा घेतली.