नाशिक | Nashik
पेठ तालुक्यात (Peth Taluka) फणसपाडा (Fanaspada) हे आदिवासी वस्ती असलेले गाव ( Tribal Village)होय. गावातील नागरिकांचा शेती (Agriculture) हा प्रमुख व्यवसाय असून याठिकाणी मोठ्या प्रमाणावर भात शेती (Rice Farming) केली जाते.
राज्यासह जिल्ह्यातील प्रत्येक भागात भाताची वेगवेगळ्या पद्धतीने लागवड (Cultivation) करण्यात येते.अशीच पद्धत फणसपाडा येथील एका शेतकऱ्याने ( Farmer) वापरली असून एसआरटी पद्धतीने भाताची लागवड केली आहे.
येथील शेतकरी प्रभाकर रामचंद्र भुसारे यांनी सगुणा राईस टेक्निक (SRT) पद्धतीद्वारे पावणे चार एकर क्षेत्रात भात लावले आहे. यामध्ये इंद्रायणी, भास्मती, ब्लॅक राईस या भाताच्या जातींचा समावेश असून वेगवेगळ्या पद्धतीने त्यांची लागवड करण्यात आली आहे.
‘एसआरटी’ पद्धतीत नांगरणी, चिखलणी आणि लावणी न करता गादी वाफ्यांवर टोकपणी करून लागवड केली जाते. ज्यामुळे शेतकऱ्यांचे श्रम आणि पैसा वाचतोच पंरतु उत्पन्नही वाढण्यास मदत होते. ज्यामुळे जमिनीची धूप होण्याचे प्रमाण कमी होते. याशिवाय जमिनीचा कर्ब वाढतो आणि उत्पादकताही वाढते.
एसआरटी’ लागवड पद्धतीमुळे भात लागवडीचा खर्च पन्नास ते साठ टक्कय़ाने कमी होतो. तर लावणी करावी लागत नसल्याने ५० टक्के श्रम कमी होऊन जमिनीची धूप २० टक्कय़ांपर्यंत थांबविता येते.
याशिवाय रासायनिक खतांचा वापर निम्म्यावर येतो. भात आठ ते दहा दिवस आधी तयार होतो. तर समान अंतरावर रोप लागवड केली असल्याने पिकांना सूर्यप्रकाश पुरेसा मिळतो. त्यामुळे पिकांची वाढ जोमात होते. तर लावणी करताना रोपांना होणारी इजाही कमी होते.
तसेच पारंपारिक भात शेतीची लागवड करतांना मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भात लागवडीसाठी जागा तयार करण्यासाठी जमीन नांगरली जाते. त्यानंतर वरच्या पावसाच्या (Rain) भरवशावर भाताची पेरणी (Sowing) केली जाते. यानंतर साधारणता दोन महिन्याने चिखल करून भाताची लागवड केली जाते. तर दिवाळीनंतर (Diwali) हे भात पिक काढले जाते.