Thursday, October 1, 2026
Homeनगरपाण्याच्या बाटलीत दारू विक्रीचा व्हिडिओ व्हायरल

पाण्याच्या बाटलीत दारू विक्रीचा व्हिडिओ व्हायरल

समृद्धी महामार्गावर पोलिसांची धाड

वैजापुर |प्रतिनिधी| Vaijapur

वैजापूर तालुक्यातील समृद्धी महामार्गावर पाण्याच्या बाटलीत कथित देशी दारू मिसळून विक्री केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर गुरुवारी वैजापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास केला. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती पाण्याच्या बाटलीत दारू मिसळून ग्राहकाला देताना दिसत असल्याने पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली.

- Advertisement -

पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचारी योगेश झाल्टे, किसन गवळी व इतर कर्मचार्‍यांनी समृद्धी महामार्गालगत असलेल्या हॉटेल द्वारकामाई येथे पाहणी केली. यावेळी हॉटेलची सखोल झडती घेण्यात आली. मात्र, तेथून कोणतीही अवैध दारू अथवा आक्षेपार्ह साहित्य आढळून आले नाही.

तपासादरम्यान संबंधित हॉटेल आवश्यक परवानगीशिवाय सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. यावर पोलीस निरीक्षक ताईतवाले यांनी हॉटेल चालकाला तात्काळ हॉटेल बंद करण्याची तंबी देत, बेकायदेशीर व्यवसाय सुरू ठेवल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला.
यावेळी हॉटेललगत असलेल्या पेट्रोल पंपाच्या बाजूला समृद्धी महामार्गाला लागून खुला मार्ग असल्याचेही आढळले. या मार्गाचा वापर संशयास्पद हालचालींसाठी होत असावा, अशी शक्यता व्यक्त करत पोलिसांनी पेट्रोल पंप चालकाला तो मार्ग तातडीने बंद करण्याचे आदेश दिले.

त्यानुसार सुरक्षेच्या दृष्टीने त्या ठिकाणी लोखंडी जाळी बसवून खुली जागा बंद करण्यात आली. व्हायरल व्हिडिओनंतर पोलिसांनी केलेल्या या तातडीच्या कारवाईमुळे समृद्धी महामार्ग परिसरातील बेकायदेशीर कृत्यांविरोधात कठोर भूमिका घेतल्याचा स्पष्ट संदेश गेला असून, अशा प्रकारांवर पुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

ताज्या बातम्या

Kopargaon : महागाई, मतदार याद्यांतील घोळ आणि दुष्काळावरून रोहित पवारांचा सरकारवर...

0
कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargaon वाढती महागाई, मतदार याद्यांतील कथित घोळ, राज्यातील दुष्काळी परिस्थिती तसेच जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील घडामोडींवरून आ. रोहित पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली....