Saturday, July 27, 2024
Homeनाशिकशनिवारी पंचवटीत काही भागात पाणी नाही!

शनिवारी पंचवटीत काही भागात पाणी नाही!

नाशिक | Nashik

पंचवटी जलशुध्दीकरण केंद्र (Panchavati Water Filtration Plant) येथील म्हसरुळ (Mhasrul) व बोरगड जलकुंभास (Borgad Water Tank) पाणीपुरवठा करणारी उर्ध्ववाहीनी पंचवटी जलशुध्दीकरण केंद्र आवारात लिकेज झाल्याने हे काम तातडीने करणे आवश्यक आहे.

- Advertisement -

दुरुस्तीचे काम शनिवार (दि.14) रोजी होणार आहे.यामुळे म्हसरुळ व बोरगड जलकुंभावरुन होणारा प्रभाग क्र.1 मधील ओंकारनगर, वृंदावननगर, प्रभातनगर, दिंडोरी रोड राणा हॉटेलपर्यंत, म्हसरुळ मखमलाबाद लिंकरोडवरील (Makhamlabad) पूर्ण परिसर, ओमनगर, गणेशनगर, स्नेहनगर, गुलमोहरनगर, शनिमंदिर परिसर, म्हसरुळ गावठाण, संभाजीनगर, बोरगड आश्रमशाळेजवळील परिसर.

तसेच आदर्शनगर, एकतानगर, प्रभातनगर परिसर, पेठरोड, जकातनाका, वेदनगरी, उज्ज्वलनगर आदी व प्र.क्र. 6 मधील कल्याणी व राजेय सोसा, मेहेरधाम, गॅसगोडावून, इंद्रप्रस्थ सोसायटी, पेठरोड (Pethroad), जकातनाका परिसर, नमन हॉटेल परिसर, संत सावतानगर, डीटीपीनगर आदी परिसरात शनिवारी सकाळचा, दुपारचा व सायंकाळचा पाणी पुरवठा होणार नाही व रविवार (दि.15) रोजीचा सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल.

याबाबत परिसरातील नागरिकांनी नोंद घेऊन महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका पाणीपुरवठा विभाग वितरण तर्फे करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या