Sunday, September 8, 2024
HomeनाशिकVideo : पुणेगाव धरण ९२ टक्के भरले; उनंदा नदीत विसर्ग सुरू

Video : पुणेगाव धरण ९२ टक्के भरले; उनंदा नदीत विसर्ग सुरू

ओझे | विलास ढाकणे | OZE

दिंडोरी तालुक्यातील (Dindori Taluka) मांजरपाडा (देवसाने) प्रकल्पाचे महत्व खऱ्या अर्थाने आज दिंडोरी तालुक्यासह येवला, मनमाड,निफाड, चांदवड तालुक्यातील जनतेला समजले आहे. दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम परिसरामध्ये आजही मध्यम स्वरूपाचा पाऊस (Rain) पडत असताना तालुक्यातील तीसगाव धरण (Tisgaon Dam) सोडता सर्व धरणांमध्ये (Dam) पाण्याची पातळी समाधानकारक वाढत आहे…

- Advertisement -

Nashik News : लाचखोर बहिरम यांना ‘इतक्या’ दिवसांची पोलिस कोठडी

दिंडोरी तालुक्यातील सहा धरणांपैकी पुणेगाव धरण (Punegaon Dam) ९२ टक्के भरल्याने धरणातून उनंदा नदीमध्ये (Unanda River) १०० क्युसेसने पाण्याचा विसंर्ग सोडण्यात आला आहे. या पाण्यामुळे ओझरखेड धरणाच्या (Ozarkhed Dam) पाणी पातळीत वाढ होणार असल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

काँग्रेसकडून लोकसभा मतदारसंघनिहाय समन्वयक जाहीर; पानगव्हाणे, आहेर, गायकवाड, डॉ.बच्छाव यांची नियुक्ती

एकीकडे धरणाच्या पातळीमध्ये वाढ होत असताना दुसरीकडे दिंडोरी तालुक्याच्या ६० टक्के भागामध्ये फक्त पावसाची रिमझिम चालू असल्यामुळे विहिरींना (Wells) पाणी उतरलेले नसून चार ते पाच दिवस हा रिमझिम पाऊस बंद झाल्यास पिकांना (Crops) पाणी देण्यासाठी सुध्दा विहिरींमध्ये पाणी नाही. त्यामुळे दिंडोरी तालुक्याच्या पूर्व भागासह अनेक ठिकाणी जोरदार पावसाची प्रतिक्षा कायम आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Sinnar News : बिबट्याच्या हल्ल्यात शाळकरी मुलगी जखमी

दिंडोरी तालुक्यातील धरणांचा आजचा पाणीसाठा

करंजवन धरण ५० टक्के, पुणेगाव धरण ९२ टक्के, पालखेड धरण ७१ टक्के, वाघाड धरण ६४ टक्के, ओझरखेंड धरण ३० टक्के, तीसगाव धरण ० टक्के

पंतप्रधान मोदींच्या हस्ते ‘अमृत भारत स्टेशन योजने’चं लोकार्पण; महाराष्ट्रातील ‘या’ रेल्वेस्थानकांचा होणार कायापालट

- Advertisment -

ताज्या बातम्या