Thursday, October 1, 2026
HomeनगरAhilyanagar : पाण्यात बुडून चार वर्षांच्या बालकाचा मृत्यू

Ahilyanagar : पाण्यात बुडून चार वर्षांच्या बालकाचा मृत्यू

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरातील बोल्हेगाव परिसरात एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. पाण्यात बुडाल्यामुळे अवघ्या चार वर्षांच्या चिमुकल्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला आहे. साई विशाल पवार असे या मृत बालकाचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बोल्हेगाव येथील भारत बेकरीजवळील आंबेडकर चौक परिसरात राहणारा साई पवार हा चिमुकला सोमवारी (20 जुलै) अचानक पाण्यात बुडाला.

- Advertisement -

घटनेची माहिती मिळताच त्याचे वडिल विशाल वसंत पवार यांनी त्याला तातडीने उपचारासाठी शहरातील खासगी रूग्णालयात दाखल केले. मात्र, रूग्णालयातील डॉक्टरांनी तपासून साई याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या प्रकरणी रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, सदर घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलिसांनी रूग्णालयात जाऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार दिनेश मोरे करीत आहेत. लहान मुलाने अचानक प्राण गमावल्यामुळे पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : अर्ज घेण्यासाठी झुंबड; दाखल करणार्‍यांची मात्र प्रतीक्षा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना उमेदवारी अर्ज घेण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र, अर्जांची विक्री मोठ्या प्रमाणात होत...