Friday, April 25, 2025
Homeनगरपालकमंत्री नसल्याने पाणी नियोजन लांबणीवर

पालकमंत्री नसल्याने पाणी नियोजन लांबणीवर

आवर्तनाचा निर्णय नसल्याने शेतकरी चिंतेत

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतरही मंत्रिमंडळ विस्तार आणि पालकमंत्री पदाची घोषणा न झाल्याने जिल्ह्यातील पाणी नियोजनही लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या हंगामात समाधानकारक पाऊस झाला असल्याने धरणं तुडूंब असल्याने पाणी उपलब्धतेची चिंता नसली तरी, पाणी वाटप नियोजनाची कालवा समिती बैठक लांबणीवर पडल्याचा परिणाम वितरणावर होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

भंडारदरा, निळवंडे, मुळा आणि दारणा, गंगापूर, कुकडीसह अन्य प्रकल्पांतून शेतीला किती पाणी द्यायचे आणि शहराला पिण्यासाठी किती पाणी आरक्षित ठेवायचे, याचा निर्णय कालवा समितीच्या बैठकीत होत असतो. पालकमंत्री या समितीचे अध्यक्ष असतात. मात्र, पालकमंत्र्यांच्या नियुक्तीअभावी पाणी वाटप नियोजनही रखडले आहे. राज्य शासनाने पाण्याचे प्राधान्यक्रम ठरविले आहेत. यामध्ये पिण्याच्या पाण्याला पहिले प्राधान्य देण्यात आले आहे. त्यानंतर शेती आणि उद्योग असा प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. भंडारदरा, निळवंडे धरणातील पाणी अकोले, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, शहराला पिण्यासाठी वापरले जाते.

तसेच या तालुक्यांसाठी पिण्यासाठी आणि शेतीसाठी उपलब्ध करून देण्यात येते. शहराला पिण्यासाठी आवश्यक पाणी, सिंचनासाठीची आवर्तने, बाष्पीभवन, जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींचा विचार करून पाण्याचे नियोजन करावे लागते.
मुळा धरणातील पाणी म. फुले कृषी विद्यापीठ, अहिल्यानगर एमआयडीसी, तसेच शहरात पिण्यासाठी पाणी, पाथर्डी, शेवगाव, राहुरी शहराला पिण्यासाठी आवश्यक पाणी, सिंचनासाठीची आवर्तने, बाष्पीभवन, जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींचा विचार करून पाण्याचे नियोजन करावे लागते. गोदावरी कालव्यातून मिळणार्‍या पाण्याचा कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा, शेवगाव तालुक्याला लाभ होतो. या कालव्याचे आवर्तनाचा निर्णयही रखडला आहे. पुण्यातील कुकडी आणि घोड धरणातील पाण्याचा लाभ दक्षिण अहिल्यानगर जिल्ह्याला होतो. तोही लांबला आहे.

आवर्तनाच्या नियोजनासाठी दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात कालवा समितीची बैठक होते. त्यामध्ये पाणी वाटपावर चर्चा करून निर्णय घेतले जातात. त्यासाठी 15 ऑक्टोबरपर्यंत धरणात उपलब्ध असलेला पाणीसाठा विचारात घेतला जातो. यावेळी विधानसभा निवडणुकीमुळे कालवा समितीची बैठक लांबणीवर पडली. त्यानंतर निवडणुकीचा निकाल लागून महायुती सत्तेत आली आहे. मात्र, मंत्रिमंडळ विस्तार आणि पालकमंत्री पदासाठीची नावे निश्चित झालेली नाही. पालकमंत्री पदासाठीची नावे लवकरात लवकर निश्चित करून धरणांतून सोडण्यात येणार्‍या आवर्तन निश्चित करावे अशी मागणी होत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...