Saturday, May 18, 2024
Homeनगरडबक्यात साठलेले पाणी पिवून विषबाधा झाल्याने 8 शेळ्यांचा मृत्यू

डबक्यात साठलेले पाणी पिवून विषबाधा झाल्याने 8 शेळ्यांचा मृत्यू

सलाबतपूर |वार्ताहर| Salabatpur

नेवासा (Newasa) तालुक्यातील सलाबतपूर येथे डबक्यात साचलेले पाणी (Water) पिऊन विषबाधा (Poisoning) झाल्याने आठ शेळ्यांचा मृत्यू (Death of Goats) झाल्याची घटना घडली आहे. तालूका पशुधन विकास अधिकारी डॉ. तेजस घुले यांनी घटनेचा पंचनामा केला.

- Advertisement -

लोकसभेला विखेंविरोधात रोहित पवार की प्राजक्त तनपुरे?

तालुक्यातील सलाबतपूर (Salabatpur) येथे मृत शेळ्यांचे मालक लक्ष्मण इंगळे हे नेहमीप्रमाणे सलाबतपूर-प्रवरासंगम रस्त्याच्या लगत शेळ्या चारण्यासाठी गेले होते. शेळ्या चारत असताना दुपारच्या वेळी उन्हाची काहिली वाढली. तशा शेळ्या (Goats) पाण्याचा ठाव घेऊ लागल्या. रस्त्याच्या लगतच शेतात उसाला पाणीही सुरु होते. मात्र विज गेल्याने पाईपलाईनचे पाणी बंद होते. तर शेजारी पाण्याचे डबके साचलेले होते. त्यात शेळ्यांच्या कळपातील आठ शेळ्या पाणी पिल्या. त्यानंतर शेळ्यांना (Goats) त्रास होऊन काही वेळातच आठ शेळ्या मृत्युमुखी (Death) पडल्याचे इंगळे यांच्या लक्षात आले.

लोकसभा निवडणुकीपूर्वीच जिल्हा विभाजन

पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी ते पाणी रासायनिक खत मिश्रीत असल्यानेच शेळ्यांना पाण्यातून विषबाधा (Water Poisoning) झाली असल्याचा अंदाज व्यक्त केला. आठ शेळ्यांच्या मृत्यूने संबधित शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेळीपालन व्यवसाय हाच त्यांचा उपजिविकेचा मुख्य स्त्रोत असून यावरच कुटुंबांची उपजिविका व मुलांचे शिक्षणही सुरु असल्याचे समजते.

घटनेची माहिती समजताच सरपंच अझर शेख, भाजपाचे दिलीप नगरे, माजी ग्रामपंचायत सदस्य अश्पाक शेख यांनी घटनास्थळी धाव घेऊन तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. तेजस घुले, सलाबतपूर येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. भास्कर, डॉ. डौले, डॉ. नाईक, डॉ. गायके, डॉ. संदिप नांगरे, डॉ. नागरगोजे यांनी पाहणी करून पंचनामा केला. सरपंच अझर शेख यांनी शासनदरबारी पाठपुरावा करून शेळीपालन व्यावसायिकाला मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

मानोरी शिवारात भरदिवसा दरोडा, वृद्ध महिलेला जबर मारहाण

- Advertisment -

ताज्या बातम्या