Sunday, November 24, 2024
Homeधुळेपाणीटंचाईग्रस्त 85 गावांचा पाणीप्रश्न सुटणार

पाणीटंचाईग्रस्त 85 गावांचा पाणीप्रश्न सुटणार

दोंडाईचा dondaicha । प्रतिनिधी

शिंदखेडा तालुक्यातील (Shindkheda Taluka) कायमस्वरूपी पाणीटंचाईग्रस्त (Water shortage) असलेली 85 गावांचा पाणीप्रश्न कायमचा (Water problem of villages) सुटावा म्हणून आ. जयकुमार रावल -MLA Jayakumar Rawal= यांच्या संकल्पनेतून 85 गाव ग्रीड योजना -Village Grid Scheme= तयार करण्यात आली असून या योजनेला केंद्र सरकारच्या (Central Govt)जलजीवन मिशनमधून (Jaljeevan Mission) मंजूरी (Approval) मिळाली आहे. या योजनेसाठी भूमिपूजन दि.25 मे रोजी आ.रावल यांच्या हस्ते तर खा.डॉ.सुभाष भामरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

- Advertisement -

सायंकाळी 5 वाजता क्रांतीस्मारक समोरील साळवे ता. शिंदखेडा येथे आयोजन करण्यात आले आहे. तापी नदीच्या शाश्वत स्त्रोतातून शिंदखेडा तालुक्यातील निम्मी गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न या योजनेमुळे कायमचा निकाली निघणार आहे.

सुलवाडे बॅरेजमधून मोठया पाईपलाईनव्दारे हे पाणी क्रांतीस्मारक साळवे येथील उंच टेकडीवर आणण्यात येणार आहे. तत्पूर्वी सुलवाडे बॅरेजजवळ जॅकवेल, इंटरवेल, पंप हाऊस तयार करण्यात येईल, साळवे गावातील उंच टेकडीवर 26 दशलक्ष लीटर क्षमतेचा जलशुध्दीकरण प्रकल्प साकारला जाणार आहे, यातून खलाणे, साळवे, सतारे, वरझडी, त्यासोबतच साळवे येथील जलशुध्दीकरण केंद्राजवळ दोन ठिकाणी जलकुंभ निर्माण करण्यात येणार आहे. त्यातील खलाणे येथील चार लाख 90 हजार लिटर क्षमतेच्या जलकुंभावरून चांदगड, डाबली, धांदरणे, गोराणे, कलमाडी, कंचनपूर, खलाणे, माळीच, पिंपरखेडा, सारवे, वाघोदे, वायपूर, विटाई, वाघाडी बु., वाघडी खु., बाभळे आदी 16 गावांना शुध्दीकरण केलेले पाणी पुरवठा करण्यात येईल.

साळवे गावातील तीन लाख 80 हजार लिटर क्षमतेच्या जलकुंभावरून 12 गावांना पाणीपुरवठा करण्यात येणार असून यात अमराळे, आरावे, चिमठावळ, डांगुर्णे, सोडले, दराणे, जखाणे, मुकटी, रोहाणे, शेवाडे, तामथरे, साळवे, गावांचा समावेश आहे. सतारे येथील दोन लाख 85 हजार लि.क्षमतेच्या जलकुंभावरून कर्ले, परसुळे, देवी, देगांव, रेवाडी, देवकानगर, अक्कलकोस, वाडी, सतारे, या 9 गावांना पाणीपुरवठा करण्यात येईल., वरझडी येथील 6 लाख 25 हजार लिटर क्षमतेच्या जलकुंभावरून 12 गावांना पाणीपुरवठा करण्यात येणार असून यात अंजनविहीरे, धावडे, खर्दे , मालपूर, मांडळ, पथारे, रामी, सुराय, कलवाडे, चुडाणे, वरझडी, झिरवे, यांचा समावेश आहे.

तर साळवे फाटयावरील येथील जलशुध्दीकरण केंद्र येथील पहिल्या तीन लाख 80 हजार लि.क्षमतेच्या जलकुंभावरून चिमठाणे, पिंप्री, दलवाडे, दरखेडा, हतनूर, कामपूर, महाळपूर, मेथी निशाणे, सोनशेलू , बाभुळदे, विखरण या 12 गावांना पाणीपुरवठा होईल. तर जलशुध्दीकरण केंद्र साळवे फाटा येथील दुस-या जलकुंभावरून पाच लाख 40 हजार लिटर क्षमता असेल त्यातून 25 गावांना पाणीपुरवठा होंईल त्यात चौगांव बु., चौगांव खु., दलवाडे प्र.नं., िचिरणे, अंजदे खु., दसवेल, दत्ताणे, गव्हाणे, शिराळे, अलाणे, होळ, जातोडे, जोगशेलू, कदाणे, मेलाणे, निरगुडी, कुमरेज, परसामळ, पिंप्रांड, रहिमपूरे, टेमलाय, वरूळ , घुसरे, भटाणे, विखुर्ले आदी गावांना समावेश आहे. अशा एकुण 85 गावांचा पाणीटंचाईचा प्रश्न कायमचा सुटणार आहे.

मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेच्या धर्तीवर योजना

सदर योजना आ.जयकुमार रावल हे मंत्री असतांना मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेच्या धर्तीवर आ.रावल यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आली होती, पंरतू त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर योजना थंडबस्त्यात पडली होती, पंरतू त्यानंतर केंद्र सरकारने जलजीवन मिशन सुरू केले त्यातून हर घर जल ही संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळातील जलशक्ती मंत्रालयाने आणली त्यात आ.जयकुमार रावल यांनी ही योजना मंजूर करून घेत शिंदखेडा तालुक्यातील कायमस्वरूपी 85 गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी शाश्वत स्त्रोत निर्माण करण्याची संकल्पना राबविली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या