राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
तालुक्यातील शेती व्यवसायात अग्रेसर असलेल्या वाकडी गावात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. शेती पिके, शेती औजारे, विद्युत मोटार, केबल, विहीर कामाचे औजारे यांसह शेळ्या, बोकड चोरीचे प्रमाण वाढत चालले आहे.
सोमवारी वाकडीत ग्रामस्थांची बैठक झाली. या बैठकीला अभिजीत पोटे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शेळके, रुपेंद्र काले, शिवाजी लहारे, मुरलीधर शेळके, बी. एल. आहेर, गणेशचे संचालक आलेश कापसे, सुरेश लहारे, गोपीनाथ जाधव, भिमराज लहारे, ज्ञानदेव शेळके, युसुफ पठाण, दीपक पटारे, मच्छिंद्र अभंग, पोलीस पाटील रूपेश एलम, नानासाहेब पवार, रमेश भालके, नानासाहेब तागड, सोमनाथ गर्जे आदींसह परिसरातील शेती पंप व शेती साहित्य चोरी गेलेले शेतकरी योगेश चौधरी, हरिश साळुंके, संगीता लहारे, बाळासाहेब धनवटे, संजय गोरे, विजय जोशी, विजय जाधव, राहुल भुसारी उपस्थित होते.
यावेळी परिसरात होणार्या चोर्या आणि रस्त्याच्या बंद कामाबाबत गावकर्यांनी केलेल्या तक्रारीवरून अभिजीत पोटे यांनी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांना दूरध्वनीवर संपर्क करून परिसरात आजपर्यंत चोरी झालेल्या 70 ते 80 शेतकर्यांच्या उपस्थितीत वीज पंप चोरीला जाऊन शेती साहित्य पाईप स्प्रिंकलर नोझल आणि रात्रीच्यावेळी रस्ता लुटीचे प्रकार घडत असून श्रीरामपूर ग्रामीण पोलीस निरीक्षक गेल्या एक महिन्यापासून सतत होणार्या चोर्या रोखण्यात अपयशी होत आहेत. आजपर्यंत त्यांनी एकदाही गावात भेट दिली नाही. पोलीस कॉन्स्टेबलही वेळेवर पंचनामे करण्यासाठी कधी येत नसल्याची तक्रार केली.
वाकडी परिसरातील वाड्या वस्त्या आणि गावे सतत होणारी गुन्हेगारी आणि पंचक्रोशीतील नागरिकांची फिर्याद देऊनही कुठलीही उपाययोजना पोलिसांकडून होत नसल्याने व कोणीही ऐकत नसल्याची तक्रार करताच जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी तातडीने कारवाई करू, असे आश्वासन दिले. दोन दिवसात चोर्यांचे सत्र थांबले नाही तर अभिजीत पोटे उपस्थितांसह पंचक्रोशीतील शेतकरी व नागरिकांना घेऊन ग्रामीण पोलीस स्टेशनवर जाऊन ठिय्या आंदोलन करू, असा इशारा यावेळी देण्यात आला.यावर जिल्हाधिकार्यांनी तात्काळ लक्ष घालत असल्याचे सांगितले.
शेतकरी संघटनेचे रुपेंद्र काले म्हणाले, परिसरातील लोकप्रतिनिधी फक्त मत मागण्या पुरतेच येतात. आज शेतकर्यांवर वेळ आली तर कोणी ढुंकूनही बघायला तयार नसल्याची भावना व्यक्त केली. विशेष म्हणजे वाकडी परिसरात बिबट्याची संख्या वाढली असताना संध्याकाळी सात नंतर शेतकरी शेतात जाण्याची हिम्मत करीत नाही. काही शेतकर्यांच्या शेतातील विहीरींमधून मध्यरात्री मोटार, केबल चोरणार्यांचे मात्र फावते. शेतातील उभे स्प्रींकलर, पाईप, पाणी सिंचन चालू असताना काही बहाद्दर चोर काढून घेऊन जात आहेत. बहुतेक शेतकर्यांनी पोलिसांत तक्रार देखील केली आहे. मात्र चोर व मोटार सापडत नसल्याने शेतकरी आता तक्रार करण्याच्या भानगडीत पडत नसले तरी म्हातारी मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोकावता कामा नये, असा प्रकार होऊ नये म्हणून वाकडी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.