Tuesday, March 25, 2025
Homeनगरशिर्डीतील भाजपचे अधिवेशन ऐतिहासिक करु - ना. विखे

शिर्डीतील भाजपचे अधिवेशन ऐतिहासिक करु – ना. विखे

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

जिल्ह्यामध्ये महायुतीला मिळालेल्या विजयाप्रमाणेच शिर्डीमध्ये पक्षाचे होत असलेले अधिवेशन ऐतिहासिक करुन आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीतही जिल्ह्यामध्ये शतप्रतिशत भाजपाच्या विजयाचा निर्धार करण्याचा संकल्प करु, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. भारतीय जनता पक्षाचे राज्यस्तरीय अधिवेशन येत्या 12 जानेवारी रोजी शिर्डी येथे होत आहे. या अधिवेशनास पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील मान्यवर नेते उपस्थित राहणार आहेत. राज्यात महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर आणि भारतीय जनता पक्षाला प्रथम क्रमांकाने मिळालेल्या जागा या सर्व वातावरणात शिर्डीमध्ये होत असलेले अधिवेशन अधिक उत्साहाने करण्याचा निर्णय पक्षाच्या प्रदेश कार्यकारणीने घेतला आहे.

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर शिर्डी येथे अधिवेशनाची नियोजन आढावा बैठक झाली. या बैठकीस ना. राधाकृष्ण विखे पाटील, पक्षाचे महामंत्री आ. विक्रांत पाटील, आ. शिवाजीराव कर्डीले, महामंत्री विजयराव चौधरी, राजेश पांडे, रवी अनासपुरे, माधवी नाईक, डॉ. सुजय विखे पाटील, स्नेहलता कोल्हे, जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, दिलीप भालसिंग यांच्यासह जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

या राज्यस्तरीय अधिवेशनास पक्षाचे सुमोर वीस हजार प्रतिनिधी उपस्थित राहतील अशा पध्दतीचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी बैठकीत विविध समित्या गठीत करण्यात आल्या. या समित्यांकडे अधिवेशनातील विविध विभागांची जबाबदारी निश्चित करण्यात आली. आ. विक्रांत पाटील, माधवी नाईक, विजयराव चौधरी, रवी अनासपुरे यांनी या बैठकी समित्यांना मार्गदर्शन करुन अधिवेशनाचे नियोजन चांगल्या प्रकारे करण्याचे आवाहन केले. नुकत्याच मिळालेल्या विजयाच्या पार्श्वभूमीवर तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीची रणनिती या अधिवेशनात ठरविली जाणार असल्याने या अधिवेशनाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

ना. विखे पाटील म्हणाले, पक्षाच्या राज्यस्तरीय नेत्यांनी या अधिवेशनाचे यजमानपद शिर्डीला दिल्याबद्दल आभार व्यक्त करुन हे अधिवेशन ‘न भूतो न भविष्यती’ अशा पध्दतीने आम्ही यशस्वी करु, विधानसभा निवडणुकीत महायुतीला ज्या पध्दतीने विजय मिळविला तसेच हे अधिवेशन सुध्दा ऐतिहासिक करण्याचा प्रयत्न जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते करतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. पक्षाच्या सर्व राज्यस्तरीय पदाधिकार्‍यांनी राज्यातून येणार्‍या प्रतिनिधींच्या निवासस्थानाचे, भोजन व्यवस्था, पार्कींग व्यवस्था याचे नियोजन करुन अधिवेशनाच्या प्राथमिक तयारीवर शिक्कामोर्तब केले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...