Monday, June 24, 2024
Homeनगर82 गावे आणि 472 वाड्यांवर पाणीटंचाई

82 गावे आणि 472 वाड्यांवर पाणीटंचाई

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

ऐन पावसाळ्यात दुष्काळसदृष्य परिस्थितीमुळे पाणी टंचाईमध्ये वाढ होण्यास सुरूवात झाली आहे. सध्या जिल्ह्यातील 82 गावे आणि 742 वाड्यांवर टंचाईच्या झळा बसत असून याठिकाणी 75 शासकीय टँकरव्दारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. या टँकरव्दारे 1 लाख 53 हजार नागरिकांची तहान सरकारी पाण्याच्या टँकरवर भागवण्यात येत असून गणेशोत्सवाचा पहिला दिवस कोरडा गेल्याने सामान्य नागरिकांसह बळीराजाची धडधड वाढली आहे.

यंदा सुरूवातीपासून पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगाम अडचणीत आला आहे. खरीप हंगामात पेरणी झाल्यानंतर पावसाने मोठा खंड दिल्याने हंगामातील पिकांचे 50 ते 95 टक्क्यांपर्यंत पिकांच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे. दुसरीकडे पाणी नसल्याने दिवसंदिवस पाणी टंचाईच्या झळा वाढतांना दिसत आहेत. आता कुठे सप्टेंबर महिन्यांचा पहिला पंधारवढा संपला असून पावसाची उघडीप कायम आहे. यामुळे सरकारी पाण्याच्या टँकरची संख्या भरपावसाळ्यात वाढतांना दिसत आहे.

जिल्ह्यात सध्या सहा तालुक्यात पाणी टंचाई निर्माण झाल्याने त्याठिकाणी जिल्हा प्रशासनाच्यावतीने सरकार पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले आहे. मात्र, पाऊस न झाल्यास त्यात झापट्याने वाढ होणार आहे. जिल्ह्यात मंगळवार (दि.19) अखेर 82 गावे आणि 742 वाड्यांवर पाण्याचे सरकारी टँकर सुरू आहेत. अनेक तालुक्यात पाण्याअभावी टँकरची मागणी असून ते सुरू झाल्यावर टँकरची संख्या वाढणार आहे. कालपासून गणेशोत्सव सुरू झाला असून उत्सवाचा पहिला दिवस कोरडा गेल्याने अनेकांची धडधड वाढली असून लवकर पावसाला सुरूवात होवून बळीराजासह सर्वसमान्यांचे होणारे हाल थांबवावेत, अशी प्रार्थना बाप्पांना करण्यात आली आहे.

असे आहेत टँकर

संगमनेर तालुक्यातील 16 गावे आणि 41 वाड्यांवर 12 टँकर, नगर तालुक्यातील 13 गावे आणि 42 वाड्यांवर 12 टँकर, पारनेर तालुक्यातील 35 गावे आणि 253 वाड्यांवर 28 टँकर, पाथर्डीत 13 गावे आणि 102 वाड्यांवर 18 टँकर, कर्जत 3 गावे आणि 27 वाड्यावंर 3 टँकर, तर जामखेड तालुक्यात 2 गावे आणि 7 वाड्यांवर 2 अशा प्रकारे 82 गावे, 472 वाड्यांवर 75 सरकारी टँकरव्दारे पाणी पुरवठा सुरू असून या ठिकाणी असणार्‍या 1 लाख 53 हजार 942 नागरिकांची तहान भागवण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या