Sunday, May 4, 2025
HomeनगरAhilyanagar : पाणीसाठा 30 टक्क्यांवर, जिल्ह्यात 120 टँकर सुरू

Ahilyanagar : पाणीसाठा 30 टक्क्यांवर, जिल्ह्यात 120 टँकर सुरू

2 लाख 6 हजार 259 नागरिकांच्या घशाला कोरड

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्ह्यात उन्हाच्या तीव्रतेबरोबर पाणी टंचाईच्या झळा वाढू लागल्या आहेत. जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम धरणात सरासरी पाणी साठा 30 टक्क्यांपर्यंत आला असून 105 गावे व 557 वाड्यावस्त्यांवरील 2 लाख 6 हजार 259 लोकसंख्येला 120 टँकरमार्फत पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

- Advertisement -

एप्रिल महिन्याच्या मध्यापासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. मे महिन्यात तर अधिक तडाखा जाणवत आहे. वाढत्या उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवनही मोठ्या प्रमाणात होत आहे. जिल्ह्यातील तीन मोठे व सहा मध्यम प्रकल्पांतील सरासरी 30 टक्क्यांपर्यंत आली असून पुढील दोन महिन्यांसाठी प्रशासनाला पाणीवापराचे नियोजन करावे लागणार आहे. जिल्ह्यात सर्वाधिक टँकर पारनेर तालुक्यात 34 सुरू आहेत. गेल्यावर्षी सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊसमान झाले. त्यामुळे पाणीटंचाई जाणवणार नाही, असा जिल्हा प्रशासनाचा अंदाज होता. त्यातूनच गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा पाणीटंचाई निवारणाचा आराखडा निम्म्याने घटून 42 कोटी रुपयांचा करण्यात आला.

मात्र, वाढत्या उन्हाने धरणातील पाणीसाठ्याचे वेगाने बाष्पीभवन होऊ लागले आहे. मार्च महिन्यांच्या अखेरच्या काळात जिल्ह्यात सर्वांत प्रथम संगमनेर तालुक्यामध्ये पाणी पुरवठा टँकरने सुरू झाला होता. त्यानंतर पारनेर, पाथर्डी, अहिल्यानगर, शेवगाव, अकोले, कर्जत व जामखेड तालुक्यांत पाणीपुरवठा करणार्‍या टँकरची संख्या वाढली आहे.

टँकरची स्थिती
संगमनेर 74 गावे आणि 52 वाड्या वस्त्यांवर 32 हजार 323 लोकसंख्येला 19 टँकर, अकोले 3 गावे 24 वाड्यावर 9 हजार 84 लोकसंख्येला 7 टँकर, नगर 41 गावे आणि 33 वाड्या वस्त्यांवर 15 हजार 740 लोकसंख्येला 10 टँकर, पारनेर तालुक्यात 28 गावे आणि 209 वाड्यावर 62 हजार 404 लोकसंख्येला 34 टँकर, शेवगाव 10 गावे 58 वाड्यांवर 15 हजार 129 लोकसंख्येला 8 टँकरद्वारे, पाथर्डी तालुक्यात 19 गावे आणि 104 वाड्यावस्त्यांवर 44 हजार 990 लोकसंख्येला 28 टँकरव्दारे, कर्जत तालुक्यात 9 गावे आणि 55 वाड्यावस्त्यांवर 16 हजार 541 लोकसंख्येला 10 टँकरद्वारे, जामखेड तालुक्यात 3 गावात 5 हजार 48 लोकसंख्येला 4 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

धरणातील पाणीसाठा
सध्या भंडारदरा धरणात 4 हजार 831 दलघफू, मुळा धरणात 11 हजार 454, निळवंडे 1 हजार 875, आढळा 522, मांडहोळ 68, पारगाव घाटशीळ 7, सिना 838, खैरी 118 तर विसापूर 149 दलघफू पाणीसाठा आहे. (सदर आकडेवारी शुक्रवार 3 मे अखेरची आहे.)

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीचे काटेकोर नियोजन

0
अहिल्यानगर/जामखेड |प्रतिनिधी| Ahilyanagar | Jamkhed राज्यात पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये मंत्रीमंडळाची बैठक होत आहे. ही बाब आपल्यासाठी निश्चितच भूषणावह आहे. प्रशासनामार्फत या बैठकीचे काटेकोर नियोजन...