Sunday, July 7, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यातील दुष्काळी भागात ३ हजार ७०० टँकरने पाणीपुरवठा

राज्यातील दुष्काळी भागात ३ हजार ७०० टँकरने पाणीपुरवठा

नाशिक जिल्ह्यातील १२ तालुक्यांमधील १२९७ गाववाडे-वस्त्यांना ३९० टँकरच्या ८७१ फेर्‍यांद्वारे पाणी

मुंबई | Mumbai

- Advertisement -

राज्यातील उष्णतेच्या लाटेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने पाण्याची (Water) मागणी वाढत आहे. धरणांमधील पाणीसाठाही आटत चालला आहे. त्यामुळे राज्यात पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरच्या (Tanker) संख्येने विक्रमी उच्चांक गाठला आहे. राज्यातल्या ११ हजारांहून अधिक वाड्या-वस्त्यांना तब्बल ३,७०० हून अधिक टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. अलीकडच्या काळातील ही पहिलीच घटना आहे.

राज्याच्या पाणीपुरवठा स्वच्छता विभागाच्या (Department of Water Supply Sanitation) वतीने राज्याच्या टँकरचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार राज्यातल्या २५ जिल्ह्यांतील भीषण परिस्थिती पुढे आली आहे. पुढील काही दिवसांत राज्यात पाण्याची परिस्थिती अधिकच गंभीर होत जाण्याची भीती पाणीपुरवठा विभागातील अधिकारी व्यक्त करत आहेत. राज्यातील एकूण २५ जिल्ह्यांमधील ३ हजार ७२ गावे आणि तब्बल ७,९३१ वाड्यांमध्ये एकूण ३ हजार ७६१ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

यामध्ये राज्यात सर्वाधिक म्हणजे १ हजार ८७४ टँकरने पाणी पुरवठा छत्रपती संभाजीनगर विभागात होत आहे. गेल्या वर्षी याच दिवशी सुमारे तेराशे गावांना फक्त ३०५ टँकरच्या सहाय्याने पाणी पुरवठा केला जात होता. पण यंदा अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. तर राज्यात सर्व लहान मोठ्या धरणांची संख्या २ हजार ९९७ आहे. या धरणामधील पाणीसाठा फक्त २२. ६४ टक्क्यांवर आला आहे. मागील वर्षी हाच पाणीसाठा (Water Reservoir) ३१, ८१ टक्के होता. कोकणात लहान मोठी मिळून एकूण १७३ धरणे आहेत. या धरणांमध्ये मिळून ३५. ८८ टक्के पाणीसाठा आहे.

नाशिक जिल्ह्यातील १२ तालुक्यांमधील १२९७ गाववाडे-वस्त्यांना ३९० टँकरच्या ८७१ फेर्‍यांद्वारे पाणीपुरवठा

नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) १५ तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात टँकरने पाणीपुरवठा करावा लागत असल्याने पावसाळा लांबला तर पाण्याचे मोठे संकट निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते.सद्यस्थितीत जिल्ह्यातील १५ तालुक्यांपैकी तीन तालुक्यांमध्ये पाण्याची उपलब्धता ठिक दिसून येत आहे. मात्र उर्वरित बारा तालुक्यांमधील १२९७ गाववाडे वस्तीवरील सहा लाख ७२ हजार ७६२ नागरिकांची तहान ३९० टँकरच्या ८७१ फेर्‍यांद्वारे भागवली जात आहे.जिल्ह्यात सर्वाधिक नांदगाव तालुक्यात ७७ टँकरद्वारे १७२ फेर्‍या , येवला तालुक्यात ५७ टँकरद्वारे ११८ फेर्‍या, मालेगावमध्ये ४९ टँकरद्वारे ९८ फेर्‍या, सिन्नरमध्ये ४४ टँकरद्वारे १२४ फेर्‍या, बागलाणमध्ये ४२ टँकरद्वारे ६३ फेर्‍या, देवळामध्ये ३३ टँकरद्वारे ७० फेर्‍या, चांदवडमध्ये ३३ टँकरद्वारे ९० फेर्‍या, पेठमध्ये १६ टँकरद्वारे ४० फेर्‍या तर इगतपुरीमध्ये १६ टँकरद्वारे ४१ फेर्‍याद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. या माध्यमातून जिल्हाभरातील ६ लाख ७२ हजार ७६२ लोकांची तहान भागवण्याचे काम केले जात आहे. त्यासाठी जिल्हाभरातील ६३ विहीरी गावांसाठी तर १३६ विहीरी या टँकरसाठी जिल्हा प्रशासनाने आरक्षित केलेल्या आहेत.

टँकरची संख्या

ठाणे४७
रायगड४७
रत्नागिरी२४
पालघर ५०
नाशिक ३९०
धुळे १०
जळगाव१०८
नगर ३३६
पुणे २५६
सातारा २०२
सांगली १०८
सोलापूर २०७
छत्रपती संभाजीनगर ७०८
जालना ५१९
बीड ४३३
धाराशिव १४६
- Advertisment -

ताज्या बातम्या