Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्याशहरात पाणी कपात होणार?

शहरात पाणी कपात होणार?

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

‘अल निनो’च्या (Al Nino) धोक्यामुळे मान्सूनवर (Monsoon) परिणाम होण्याची शक्यता असून यंदाच्या वर्षात पाऊस (rain) लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत.

- Advertisement -

उपलब्ध पाणी साठा आॅगस्ट अखेरपर्यंत पुरवण्याचे नियोजनावर महापालिकेने काम सुरु केले असून एप्रिलपासून शहरात आठवड्यातून एकदा पाणी कपात (Water reduction) करण्याचा प्रस्ताव विचारधीन असून त्याबाबत लवकरच आयुक्तांकडून निर्णय घेतला जाणार आहे. शहराला पाणी पुरवठा (Water supply) करणार्‍या गंगापूर धरणात (gangapur dam) ६४ टक्के जलसाठा आहे. शहराची रोजची गरज ५४० एमएलडी पाणी इतकी आहे. ते पाहता ३१ जुलैपर्यंत शहराला पाणी पुरवठा करणे शक्य आहे.

मात्र, आगामी एप्रिल व मे महिना कडक उन्हाळा (summer) असून तापमान चढे राहिल असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे साहजिकच धरणातील पाण्याचे बाष्पीभवन (Evaporation of water) वेग जादा असेल. शिवाय येणार्‍या काळात आवर्तन देखील सोडावे लागणार आहे. त्यामुळे गंगापूर धरणातील जलसाठ्यात झपाट्याने घट होण्याची चिन्हे आहेत. त्यात हवामान विभागाने (Department of Meteorology) ‘अल निनो’चा (Al Nino) धोका वर्तवल्याने यंदाच्या हंगामात मान्सून लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत.

ऐरवी जुलै अखेर पावसाला (Monsoon) सुरुवात होते. ‘अल निनो’च्या इशार्‍यामुळे पावसाला आॅगस्टचा मुहूर्त लागण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत उपलब्ध जलसाठ्यावर जुलैअखेरपर्यंत तहान भागवली जाऊ शकते. पण वेधशाळेचा इशारा पाहता आॅगस्ट अखेरपर्यंत पाणी पुरवायचे असेल तर काटकसर करावीच लागणार आहे. त्याचे नियोजन मनपा प्रशासनाने (Municipality administration) सुरु केले असून एप्रिल महिन्यापासून आठवड्यात एक दिवस पाणी पुरवठा (Water supply) बंद ठेवला जाईल.

तसेच मे महिन्यात आठवड्यातून दोन दिवस पाणी पुरवठा बंद केला जाईल. जेणेकरुन काटकसर केल्याने आॅगस्टपर्यंत शहराची तहान भागविणे शक्य होईल. तसेच पावसाला विलंब झाला व असमाधानकारक पाऊस पडल्यास आणखी पाणी कपातीचा कटू निर्णय मनपा प्रशासनाला घ्यावा लागू शकतो. महापालिकेच्या ३१ विहीरी असून आवश्यकता भासल्यास त्यांचा वापर केला जाईल. तसेच वेळेप्रसंगी १६० खासगी विहीरी अधिग्रहीत केल्या जाईल अशी माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली.

शासनस्तरावर लवकरच निर्णय

राज्यशासनाच्या सुचनेनंतर महापालिकेने पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला आहे. याबाबत राज्यशासनाने सर्वच जिल्हांचे जिल्हाधिकारी व जलसंपदा विभाग अधिकारी यांच्याशी व्हिसीद्वारे संवाद साधला असून लवकरच त्यांच्याकडून पाणीकपातीबाबत सूचना प्राप्त होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या