Wednesday, July 24, 2024
HomeनाशिकNashik News : नाशकात विजांच्या कडकडाटासह पाऊस; गंगापूर धरणातून 'इतक्या' क्युसेसने विसर्ग

Nashik News : नाशकात विजांच्या कडकडाटासह पाऊस; गंगापूर धरणातून ‘इतक्या’ क्युसेसने विसर्ग

नाशिक | Nashik

- Advertisement -

गेल्या तीन दिवसांपासून नाशिक शहरात सकाळच्या सुमारास ऊन तर दुपारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पाऊस (Rain)बरसत आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे शाळेतील विद्यार्थ्यांसह (School Students) नागरिकांचे तारांबळ उडत आहे. तर दुसरीकडे ग्रामीण भागांत देखील मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. यामुळे गंगापूर धरणातून आज चार वाजता विसर्ग सुरु करण्यात येणार आहे…

Nashik News : चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट; तिघे जखमी

तर गंगापूर धरण क्षेत्रात तसेच पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरु असल्यामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे सायंकाळी चार वाजता गंगापूर धरणातून २२७२ क्यूसेसने विसर्ग सोडण्यात येणार आहे. त्यामुळे गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असून प्रशासनाने गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर सध्या गंगापूर धरणात ९७ टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध असून धरण समूहात ८४ टक्के पाणी आहे.

Nashik Rain News : नाशिकमध्ये सकाळी ऊन तर दुपारी पाऊस; नागरिकांचे हाल

दरम्यान, आज सकाळी नाशिक शहरातील काही भागांत ढगाळ वातावरण (Cloudy weather) तर काही भागांत ९ ते १० वाजेच्या सुमारास कडक ऊन पडले होते. मात्र, त्यानंतर ११ वाजेच्या सुमारास ढग दाटून आले आणि दुपारी १२ वाजता शहरातील विविध परिसरात तुफान पाऊस कोसळला. यानंतर पुन्हा दुपारी तीन वाजता विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरु झाला असून शहरातील रस्त्यांवर (Road) आणि गल्ल्यांमध्ये पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

पहिल्या दिवशी एटीएममध्ये चोरीचा डाव फसला, दुसऱ्या दिवशी मात्र चोरांनी तेच एटीएम फोडले

- Advertisment -

ताज्या बातम्या