नेवासा । तालुका प्रतिनिधी
मुळा धरणाची एकूण साठवण क्षमता 26 टीएमसी एवढी असुन आजघडीला धरणाच्या जलाशय परिचालन सूचीनुसार लोअर गाईड व अप्पर गाईड कर्व्हनुसार पाणीसाठा नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे आज सोमवार (१२ ऑगस्ट) रोजी दुपारी ३ वाजता मुळा धरणातून २ हजार क्यूसेक्सने नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार आहे.
हे ही वाचा : हाथरसची पुनरावृत्ती! सिद्धनाथ मंदिरात चेंगराचेंगरी, सात भाविकांचा मृत्यू
आपत्कालीन परिस्थितीमध्ये आवश्यकता भासल्यास मुळा धरणातून नदीपात्रामध्ये टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवण्यात येणार असुन मुळा नदीकाठच्या गावांनी आवश्यक ती दक्षता घेण्याचे आवाहन मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी केले आहे.
हे ही वाचा : श्रीरामपूर जिल्हा निर्मितीच्या विषयाला कॅबिनेटमध्ये मीच वाचा फोडणार
नदीकाठावरील गावातील नागरिकांनी नदीपात्रातील चल मालमत्ता, चीजवस्तु ,वाहने, पशुधन , शेती अवजारे व इतर मनुष्य उपयोगी संसाधने सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावी. नदीपात्रात प्रवेश करु नये. कुठलीही जिवित व वित्त हानी होणार नाही याबाबत दक्षता घेण्याचे आवाहनही त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.