Tuesday, June 16, 2026
Homeब्रेकिंग न्यूजओबीसी प्रवर्गात आम्हाला दुसरे वाटेकरी नको - मंत्री छगन भुजबळ

ओबीसी प्रवर्गात आम्हाला दुसरे वाटेकरी नको – मंत्री छगन भुजबळ

ओबीसी प्रवर्गावर अन्याय झाल्यास आंदोलनाची घोषणा

- Advertisement -

मुंबई । वृत्तसंस्था Mumbai

मराठा समाजाला इतर मागासवर्गीय प्रवर्गातून आरक्षण मिळावे या साठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरु केले आहे . दरम्यान मनोज जरांगे पाटील यांचा उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीचा ओबीसी नेत्यांनीही आता विरोध दर्शविला आहे. ओबीसी प्रवर्गात आम्हाला दुसरे वाटेकरी नकोत अशी भूमिका घेत आता ओबीसीचेही आंदोलन उभारण्याची घोषणा मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे.

दरम्यान आज ओबीसी नेते छगन भुजबळ भुजबळ यांनी राज्यातील सर्व ओबीसी नेत्यांची मुंबईत बैठक बोलविली होती . मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये, अशीच भूमिका सर्व ओबीसी नेत्यांची आहे. मराठा समाज आणि कुणबी एकच आहे असे म्हणणे हे चुकीचे असल्याचे कोर्टानेच म्हटले असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

दरम्यान, छगन भुजबळांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यांना हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाची आरक्षणाबाबतची जजमेंट्स दाखवली. त्यांना सांगितलं की आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर आम्ही दुसऱ्या दिवशी कोर्टात जाऊ. संविधानातून निर्माण झालेली ही कागदपत्रे आहेत. ही सर्वांना मान्य करावी लागतील. ते लोक काय करणार याबाबत आम्हाला काहीही कर्तव्य नाही. आपण आता तयारीला लागा, अनेक ठिकाणी उपोषणे सुरु करायची आहेत. तहसीलदारापासून कलेक्टरपर्यंत सगळीकडे मोर्चे काढा. त्यांना आमच्या ओबीसीच्या वाट्यामध्ये दुसरे वाटेकरी नकोत ही मागणी करा असा आदेश भुजबळांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.

चंद्रपुरमध्ये ओबीसी संघटनांनी आज एक मोठी बैठक घेत जरांगेंच्या प्रयत्नांना जोरदार विरोध करण्याचे ठरविले आहे. चंद्रपूर शहरातील गांधी चौकात उद्या 2 सप्टेंबर रोजी निदर्शने करण्यात येणार आहेत. तसेच 13 सप्टेंबर रोजी शहरात ओबीसी महामोर्चा चे आयोजन करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : लाचलुचपत विभागाचे बनावट अधिकारी गजाआड! आलिशान गाडीसह...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik सरकारी कार्यालयात रुबाब दाखवून आणि आपण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (Anti-Corruption Bureau) बडे अधिकारी असल्याचे भासवून दिशाभूल करणाऱ्या एका हायप्रोफाइल टोळीचा...