Monday, June 22, 2026
Homeदेश विदेशDonald Trump On Iran: इराणवरील युध्द आम्ही जिंकलो, आता हल्ल्यासारखं काहीच उरलं...

Donald Trump On Iran: इराणवरील युध्द आम्ही जिंकलो, आता हल्ल्यासारखं काहीच उरलं नाही; डोनाल्ड ट्रम्प नेमकं काय म्हणाले?

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
गेल्या १३ दिवसांपासून इराणवर अमेरिका आणि इस्रायलकडून वारंवार हल्ले करण्यात येत आहे. तर इराणकडून पलटवार सुरु आहे. याचदरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज इराणविरोधातील युद्ध जिंकल्याचा मोठा दावा केला आहे. सुरूवातीला केलेल्या काही हल्ल्यानंतरच युद्धाचा परिणाम समोर आला, असेही ट्रम्प म्हणाले.

केंटकीमधील हेब्रॉन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची रॅली झाली. बुधवारी झालेल्या या रॅलीत बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरोधातील युद्ध अमेरिकेने सुरुवातीच्या काही तासांमध्येच जिंकले, असा दावा केला.

- Advertisement -

हल्ला करण्यासारखे ठिकाण उरले नाही
इराणमध्ये हल्ला करण्यासारखं ठिकाण उरले नाही. इराण पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. अमेरिकेने इराणविरुद्धचे युद्ध जिंकलेय, असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. इराणचे सर्व महत्वाचे नेते मारल्याचा दावाही डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. तसेच इराणच्या 58 जहाजांना समुद्राच्या बुडाला नेले, असेही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

मोठी बातमी! विधान भवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी, तपास यंत्रणांकडून सर्च ऑपरेशन

पहिल्या तासाभरातच आपला विजय
“अमेरिकेच्या लष्कराने आधीच विजय निश्चित केला आहे, पण अमेरिका घाईघाईत सैन्य मागे घेणार नाही. आम्ही जिंकलो आहोत, असे तुम्हाला म्हणायला कधीच आवडत नाही. पण, आपण जिंकलो आहोत. पहिल्या तासाभरातच आपला विजय झाला. आता अमेरिकेचे सैन्य फक्त उर्वरित मोहीम फत्ते करण्याच्या कामात गुंतलेली आहे”, असे डोनाल्ड ट्रम्प या रॅलीत म्हणाले.

ऑपरेशन एपिक फ्युरी नाव कसे दिले गेले याचाही किस्सा
ट्रम्प यांनी इराणविरोधात सुरू केलेल्या युद्ध मोहिमेला ऑपरेशन एपिक फ्युरी नाव कसे दिले गेले याचाही किस्सा सांगितला.

ते उपस्थित जनसमुदायाला म्हणाले, ‘ऑपरेशन एपिक फ्युरी हे नाव कसे निवडण्यात आले. हे खरेच खूप चांगले नाव आहे का? जर तुम्ही जिंकलात तर ते ठीक आहे आणि आपण जिंकलो आहोत.’ ‘२० नावे माझ्यासमोर ठेवण्यात आली होती आणि मला झोप येत होती. मला त्यातील एकही नाव आवडले नाही. मग मी एपिक फ्युरी हे नाव बघितले आणि मी म्हणालो की, मला हे नाव आवडले आहे’, असा किस्सा ट्रम्प यांनी सांगितला.

ताज्या बातम्या

Crime News : बुर्‍हाणनगरच्या अड्ड्यावर कॅम्प पोलिसांची धाड

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या पथकाने बुर्‍हाणनगर ते नागरदेवळे रोडलगत असलेल्या शेडमध्ये पहाटेच्या वेळी सुरू असलेल्या बेकायदा जुगार अड्ड्यावर छापा टाकून 11 जणांना...