Friday, May 31, 2024
Homeमहाराष्ट्रRain Update : पुण्यासह पिंपरी चिंचवड व ग्रामीण भागात दमदार 'कमबॅक', राज्यभर...

Rain Update : पुण्यासह पिंपरी चिंचवड व ग्रामीण भागात दमदार ‘कमबॅक’, राज्यभर पावसाची स्थिती काय?

पुणे | Pune

पुण्यात (Monsoon update) पुन्हा एकदा पावसाने जोर (Weather forecast) धरला आहे. रात्रीपासून (maharashtra weather update) पावसाने चांगलंच पुनरागमन केलं आहे. पुणे, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात पाऊस पडत आहे. महिनाभर पावसाने मोठा ब्रेक घेतल्यामुळे नागरिकांमध्ये आणि महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावल्यामुळे काही प्रमाणात शेतकरी सुखावला आहे.

- Advertisement -

शुक्रवारी रात्री पुण्याच्या बिबवेवाडी, कोथरूड, पेठ परिसर, एनआयबीएम, शिवाजीनगर, हडपसर आदी भागात मुसळधार पाऊस झाला. याशिवाय पुणे ग्रामीणमधील पिंपरी चिंचवडमधील मोशी व मावळ तालुक्यातही जोरधारा कोसळल्या. शनिवारी सकाळी 9.05 वाजेपर्यंत शिवारीजनगरात 19 मिमी पावसाची नोंद झाली. तर चिंचवडमध्ये 83.5 मिलिमीटर, मगरपट्ट्यात 54 एमएम, लोहेगावात 31.8 मिमी व पाषाणमध्ये 12.2 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

दरम्यान, यंदा समाधानकारक पाऊस न झाल्याने तसेच पावसाने दडी मारल्याने शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे अद्याप पूर्ण क्षमतेने भरली नाहीत. या पार्श्वभूमीवर आज होणाऱ्या कालवा समितीच्या बैठकीत पुणे शहरातील पाणी कपातीचा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत आज सायंकाळी साडे पाच वाजता कालवा समितीची बैठक होणार आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थितीत राहणार की नाही, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

दरम्यान, राज्यभरात पुढील पाच दिवस हलक्या ते मध्य स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता हवमान विभागाने वर्तवली आहे. पुढील 24 तासांत मराठवाड आणि मध्य महाराष्ट्रतील 11 जिल्ह्याला हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केल आहे. या जिल्ह्यात हलका किंवा मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो. आज कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हलका आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याचे हवामान विभाने सांगितले आहे. राज्यात कोणतीही मजबूत हवामान स्थिती सक्रिय नाही. यामुळे राज्यात पुढील पाच दिवसांत हलका पाऊस पडू शकतो. पण हवामानात पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेतकऱ्यांसाठी हा काळ खूप चिंतेचा आहे. कारण, शेतकऱ्यांना पिके जगवण्यासाठी हलक्या सिंचन पद्धतीवरच अवलंब करवा लागेल, असे पुणे हवामान आणि अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या