Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रRain Alert : राज्यात पुढचे पाच दिवस तुफान पाऊस, 'या' भागांना अलर्ट...

Rain Alert : राज्यात पुढचे पाच दिवस तुफान पाऊस, ‘या’ भागांना अलर्ट जारी

मुंबई | Mumbai

देशातील अनेक भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यातच आता १८ जुलैच्या सुमारास चक्रीवादळाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचा परिणाम हा राज्यातील पावसाच्या स्थितीवर देखील होणार आहे.

- Advertisement -

हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात पुढील पाच दिवस काही ठिकाणी हलका ते मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार १८ ते २० जुलैदरम्यान गोवा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील ४-५ दिवस मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल असा इशारा देण्यात आला आहे. मोसमात पहिल्यांदाच मराठवाड्यातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज कोकण आणि विदर्भात काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर चंद्रपूरमध्ये जोरदार पाऊस पडू शकतो. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आज यलो अलर्ट तर विदर्भातही यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

मुंबई शहर, उपनगरात रविवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला असून मुंबईत पावसाचा जोर कायम राहिला तर सखल भागात पाणी साचण्याची शक्यता देखील वर्तवली जाते. तसेच मुंबईची लोकल ट्रेनची वाहतूक सुरळीत सुरू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या