मुंबई | Mumbai
राज्यातल्या तापमानात (Temperature) आणखीन घट झाली आहे. तापमानाचा पारा आणखी घसरला आहे. राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पहाटेच्या तापमानात कमालीचं घट झाली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पहाटेचं तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली गेलं आहे. (Maharashtra Weather Update)
Mouni Roy : मौनी रॉयच्या शाही विवाहसोहळ्याचे खास फोटो बघितले का?
कोकण, मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्हे गारठले आहेत. तर उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातही थंडीचा कहर सुरूच असून सर्वच जिल्ह्यांतील पाऱ्यात पुन्हा मोठी घट झाली आहे. थंडीच्या तीव्र लाटेमुळे नागपूरच्या तापमानात दीड अंशाची घसरण होऊन पारा विदर्भात नीचांकीवर आला.
PHOTO : का होतेय अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’वर बंदीची मागणी?
हवामान विभागाने विदर्भात आणखी चोवीस तासांचा ‘येलो अलर्ट’ दिला असला तरी, त्यानंतरही काही दिवस थंडीचा कडाका कायम राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. (Maharashtra Winter Update)
महाराष्ट्रात काही भागात येत्या दोन-तीन दिवसात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. विदर्भात हवामानात मोठी घट दिसून येईल. तसेच उत्तर-पश्चिम, मध्य भारत, पूर्व भारत आणि मध्य प्रदेशच्या काही भागात थंडीची लाट राहील. या काळात देशातील अनेक राज्यांमध्ये पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.
‘प्रियांका चोप्रा-निक जोनास’प्रमाणेच ‘या’ सेलिब्रेटींच्या घरातही सरोगसीद्वारे पाळणा हलला
हवामान विभागाच्या माहितीनुसार, पंजाब, हरियाणा, चंदीगड, राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेश, विदर्भ, बिहार आणि छत्तीसगड या राज्यांत येत्या दोन ते तीन दिवसांत थंडीची लाट येण्याची दाट शक्यता आहे. २८ ते ३० जानेवारी दरम्यान विलग भाग आणि ओडिशात. पुढील २४ तासांत मध्य प्रदेशातील निर्जन भागात तीव्र थंडीची लाट राहील. यादरम्यान मध्य प्रदेशातील विविध भागात थंड वारे वाहतील.
तसेच पुढील २४ तासांत हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि विदर्भात आणि पुढील दोन दिवस उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काही ठिकाणी थंडी पडण्याची शक्यता आहे.
Dhanush and Aishwaryaa : धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत यांचा घटस्फोट, का घेतला निर्णय?