Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्याथंडीतून होणार सुटका तर 'या' भागांत पावसाचा इशारा; काय हवामान विभागाचा अंदाज?

थंडीतून होणार सुटका तर ‘या’ भागांत पावसाचा इशारा; काय हवामान विभागाचा अंदाज?

मुंबई | Mumbai

गेल्या अनेक दिवसांपासून देशभरात थंडीची लाट (Cold Wave) पसरली आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी विविध ठिकाणी शेकोट्या पेटवल्या आहेत. अशातच एक दिलासा देणारी बातमी भारतीय हवामान विभागाने (IMD) दिली आहे. पुढच्या पाच दिवसांमध्ये हा जोर कमी होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

- Advertisement -

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, २१ जानेवारीपर्यंत हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मात्र, २२ जानेवारीनंतर येथील हवामानात बदल होईल. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे २३ जानेवारी ते २५ जानेवारी दरम्यान राज्यात विविध ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली या राज्यांमध्येही पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

येत्या काही दिवसात तापमानात वाढ होणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. त्यामुळे लोकांना थंडीपासून थोडा दिलासा मिळणार आहे. उत्तर प्रदेशात येत्या पाच दिवसात कमाल तापमानात ४ ते ४ अंश सेल्सिअसने हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे, तर किमान तापमानात २ ते ३ अंशांची वाढ होणार आहे.

मात्र, येत्या २४ तासात त्यात कोणताही बदल दिसणार नाही. सक्रिय वेस्टर्न डिस्टर्बन्स हळूहळू पुढे सरकत आहे. त्यामुळे २३ ते २६ जानेवारी दरम्यान जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

तसेच उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्याचे लोट कमी होणार असल्यामुळे राज्यातील तापमान देखील २ ते ३ अंशांनी घसरेल अशी माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

हवामाना विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा थंडीचा कालावधी कमी असल्याची माहिती आहे. पण तरीदेखील मुंबई, कोकण, खानदेश, नाशिक, पुणे, सातारा, औरंगाबाद आणि नगर या जिल्ह्यांमध्ये कडाक्याची थंडी पडल्याचं पाहायला मिळालं. ही थंडी कमी होण्यासाठी आणखी ५ दिवसांचा कालावधी लागणारे आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या