Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रRain Alert : राज्यात आज कुठे पडणार पाऊस? कोणत्या जिल्ह्यांना रेड आणि...

Rain Alert : राज्यात आज कुठे पडणार पाऊस? कोणत्या जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट? वाचा…

मुंबई । Mumbai

राज्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. अनेक शहरांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या सरी बरसत आहेत. दरम्यान हवामान विभागाने आजही राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. राज्यातील कोकणासह, रत्नागिरी, पालघर, विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, गोंदिया आणि पुणे या जिल्ह्यांना हवामान विभागाने आज रेड अलर्ट जारी केला आहेत्यामुळे या ठिकाणच्या शाळा बंद ठेवण्याचा आदेश प्रशासनाने दिला आहे. तर रायगड आणि साताऱ्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. तसेच जालना जिल्ह्यात आज हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.

- Advertisement -

रेड अलर्ट असलेल्या जिल्ह्यांतील सर्वच नद्यांच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ झाली आहे. आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. हवामान खात्याने यवतमाळ जिल्ह्यात अतिमूसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात मुसळधार पाऊस झाला असून बहुतांश रस्ते वाहतुकीस बंद आहेत. पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास शालेय विद्यार्थी यांना घरी जाण्यास अडथळा निर्माण होवू नये जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालय शाळा आज बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. पालघर जिल्ह्यातील पावसाचा जोर पाहता सर्व अंगणवाड्या तसेच सर्व सरकारी आणि खासगी शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

दरम्यान, आज हवामान विभागाने मुंबईसह ठाणे परिसरातही मुसळधार पावासाचा इशारा दिला आहे. यानुसार, मुंबई दक्षिण मुंबई, पूर्व आणि पश्चिम उपनगरात पहाटेपासून पावसाचा जोर कायम आहे. यामुळे मुंबईच्या काही सखल भागात पाणी साचले असून मुंबईतील अंधेरी सबवे पाण्या खाली गेल्यामुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तसेच वसई-विरारमध्ये पावसाचा जोर कायम असून नालासोपाऱ्यातील अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. गेल्या आठवड्याभरापासून नाशिकमध्ये पाऊस नव्हता. पण आज नाशिकच्या मालेगावमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. वर्धा देखील पावसाचा जोर कायम असल्याने धरणातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्याचबरोबर अमरावती जिल्ह्यातील उर्ध्व वर्धा धरणाच्या पाणी पातळी देखील वाढ झाली असून या धरणाचे सात दरवाजे उघडण्यात आले. यातून 300 घन मीटर प्रति सेकंद प्रमाणे पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

यलो, ऑरेंज आणि रेड अलर्ट म्हणजे काय?

यलो अलर्ट – हवामान खात्याकडून अनेक शहरांना यलोअलर्ट दिला जातो. याचा अर्थ पुढील काही दिवसांमध्ये हवामानाच्या बदलामुळे संकट ओढवू शकते, अशी सुचना जारी करण्यात येते. दैनंदिन कामे रखडू शकतात त्यामुळे सावधगिरी बाळगण्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात येतो.

ऑरेंज अलर्ट – कोणत्याही क्षणी नैसर्गिक आपत्ती येऊ शकते. येणाऱ्या संकटासाठी नागरिकांनी तयार रहावे म्हणून प्रशासनाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात येतो. वीजपुरवठा खंडित होणे, वाहतूक ठप्प होण्यासारखे प्रकार घडू शकतात. ही एक प्रकारे पुढच्या संकटाची तयारी असते. गरज असेल आणि महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा असेही या अलर्टमध्ये सांगितले जाते.

रेड अलर्ट – नैसर्गिक आपत्ती ओढावल्यानंतर नागरिकांनी सतर्क राहण्यासाठी रेड अलर्टला जारी करण्यात येतो. जेव्हा एखाद्या भागात अतिमुसळधार किंवा अतिवृष्टीचा अंदाज असतो अशा वेळी रेड अलर्ट जारी करण्यात येतो. या अलर्टचा अर्थ लोकांनी स्वतःला आणि इतरांना सुरक्षित ठेवावं आणि धोकादायक भागात जाऊ नये असा असतो. रेड अलर्टमध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये मोठं नुकसान होण्याची शक्याता असते.

- Advertisment -

ताज्या बातम्या