Wednesday, January 7, 2026
HomeनगरAhilyanagar : संकेतस्थळ ठरणार गावाचा आरसा

Ahilyanagar : संकेतस्थळ ठरणार गावाचा आरसा

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान || 650 ग्रामपंचायतींचा कारभार आता वेबसाईटवर!

अहिल्यानगर |ज्ञानेश दुधाडे| Ahilyanagar

केंद्र आणि राज्य शासन ग्रामविकासाची उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवून कोट्यवधी रुपयांचा निधी देते. त्या प्रत्येक घटकारसाठी ग्रामपंचायतीने नेमके काय केले हे आता संकेत स्थळाच्या (वेबसाईटच्या) माध्यमातून उलगडणार आहे. यामुळेच प्रत्येक ग्रामपंचायतीची वेबसाइट म्हणजे ग्रामपंचायतीच्या कारभाराचा आरसाच ठरणार आहे. नगर जिल्ह्यातील 1 हजार 327 पैकी 50 टक्के म्हणजेच 650 हून ग्रामपंचायतींची वेबसाईट तयार झालेल्या आहेत.

- Advertisement -

राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीची वेबसाइट नव्याने विकसित होणार असून या माध्यमातून त्या गावचा कारभारच जगासमोर उमटणार आहे. यापूर्वी याबाबत सुचना देवूनही नगरसह राज्यातील अनेक ग्रामपंचायतींनी वेबसाइट विकसित करण्याकडे दुर्लक्ष केले होते. परंतु, आता ग्रामविकास विभागाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानच्या पार्श्वभूमीवर या वेबसाइट कशा पद्धतीने विकसित करावयाच्या आहेत. याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानूसार नगर जिल्ह्यातील 1 हजार 327 पैकी 50 टक्के म्हणजेच 650 हून अधिक ग्रामपंचायतींच्या वेबसाईट तयार झालेल्या आहे. यामुळे ग्रामपंचायतीचा जमा-खर्चही जगाला कळणार आहे.

YouTube video player

राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाला 17 सप्टेंबरपासून सुरुवात झाली असून 31 डिसेंबर 2025 पर्यंत ते चालणार आहे. यासाठी राज्य, जिल्हा आणि तालुका पातळीवर अव्वल येणार्‍या ग्रामपंचायतींना तब्बल 245 कोटी रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. याबाबत आधी राज्य पातळीवरून ग्रामविकास विभागाने तर त्यानंतर प्रत्येक जिल्हा परिषद पातळीवरून पंचायत समित्या आणि त्यानंतर थेट सर्व ग्रामपंचायतींना सुचना देण्यात आल्या. त्यानूसार मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सहभागी होवून प्रत्येक तालुका पातळीवर पंचायत समितीने आणि जिल्हा परिषद पातळीवर जिल्हा परिषदेने अभियान यशस्वी करण्यासाठी कंबर कसली आहे.

या अभियानात वेगवेगळ्या बाबींसह प्रत्येक ग्रामपंचायतींनी स्वत:ची वेबसाइट तयार करून तिच्या मुख्यपृष्ठावर, ग्रामपंचायतीबद्दल माहिती, प्रमुख प्रकल्प आणि उपक्रम, योजना आणि लाभार्थी माहिती, घोषणा आणि परिपत्रके, ग्राम पायाभूत सुविधा, अर्थसंकल्प आणि पारदर्शकता, नागरिक सेवा आणि फॉर्म्स, आमचे गाव, ओळख आणि संस्कृती, रोजगार आणि कौशल्य विकास, शिक्षण आणि युवक कोपरा, तक्रार निवारण आणि फीडबॅक, पर्यावरण आणि शाश्वत विकास अशा 13 घटकांच्या माध्यमातून ग्रामपंचायतीचा कारभारच वेबसाइटच्या माध्यमातून जगासमोर येणार आहे.
या वेबसाइटवर प्रत्येक गावाचा इतिहासही मांडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्या गावातील पर्यटनस्थळे, मंदिरे, गावाची वैशिष्ट्ये, लोककला आणि संगीत परंपरा, स्वातंत्र्यसैनिक, कलाकार, शिक्षक यांच्यासह प्रमुख मान्यवर, गौरवशाली व्यक्तींची माहिती तसेच स्थानिक गावातील उत्पादनांची सविस्तर माहिती या वेबसाइटवर देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ग्रामविकास विभागाकडून वेबसाइट विकसित करण्यासाठी सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार अधिकाधिक माहिती देणार्‍या, प्रभावी वेबसाइट निर्मिती करण्याबाबत ग्रामपंचायतींना सूचना देण्यात आल्या आहेत. नगर जिल्ह्यात राहाता, श्रीगाेंंदा तालुक्यातील जवळपास 100 टक्के तर उर्वरित तालुक्यापैकी 50 टक्के ग्रामपंचायतीच्या वेबसाईट तयार झालेल्या आहे. यशवंत पंचायत राज अभियानात यासाठी स्वतंत्रपणे दोन गुण मिळणार आहेत.
– दादासाहेब गुंजाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

ताज्या बातम्या

Nashik Accident News : चाचडगाव टोलनाक्याजवळ ईरटीका-स्कॉर्पिओचा भीषण अपघात; चौघे जागीच...

0
दिंडोरी | Dindori तालुक्यातील नाशिक-पेठ रस्त्यावरील (Nashik-Peth Road) चाचडगाव टोलनाक्याजवळ (Chachadgaon Toll Plaza) ईरटीका आणि स्कॉर्पिओचा भीषण अपघात (Ertika-Scorpio Accident) झाल्याची घटना घडली आहे. या...