Wednesday, January 7, 2026
Homeक्राईमJamkhed : मंगल कार्यालयातुन नववधूचे सोन्याचे दागिने चोरीला

Jamkhed : मंगल कार्यालयातुन नववधूचे सोन्याचे दागिने चोरीला

जामखेड |तालुका प्रतिनिधी| Jamkhed

येथील मंगल कार्यालयातून नववधूंसाठी (Bride) आणलेले 75 ग्रॅम वजनाचे पावणेचार लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने (Gold Jewelry) बुधवारी (दि.14) अज्ञात चोरट्याने चोरुन (Theft) नेले. याप्रकरणी प्रताप कल्याण काकडे (रा. बोर्ले, ता. जामखेड) यांच्या फिर्यादीवरुन जामखेड पोलीस ठाण्यात (Jamkhed Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याप्रकरणी अधिक माहिती अशी, फिर्यादी काकडे यांच्या दोन मुलांचे लग्न (Wedding Ceremony) जामखेड तालुक्यातील राजेवाडी येथील मातोश्री मंगल कार्यालय येथे बुधवारी होते. लग्न लागल्यानंतर सप्तपदीचा कार्यक्रम होणार होता. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सोन्याचे दागिने (Gold Jewelry) ठेवलेला स्टीलचा डबा लग्नाचे साहित्य ठेवले होते. त्या ठिकाणी ठेऊन काकडे लघुशंकेसाठी गेले. परत आल्यानंतर त्यांना डबा जागेवर दिसून आला नाही. त्यांनी नातेवाईकांकडे चौकशी केली, मात्र सोने ठेवलेला डबा सापडला नाही. डबा चोरी झाल्याचे समजताच काकडे यांनी जामखेड पोलीस ठाण्यात (Jamkhed Police Station) फिर्याद दाखल केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल संजय लोखंडे करीत आहे.

YouTube video player

सीसीटीव्ही बसविण्याची मागणी
मंगल कार्यालयातील लग्न समारंभात गर्दीचा फायदा घेत चोरटे सोन्याचे दागिने चोरी करुन हात साफ करतात. विशेष म्हणजे लग्नकार्यास येणार्‍या लोकांच्या दुचाकी देखील चोरटे चोरुन नेत असल्याच्या घटना घडल्या आहेत. जामखेड तालुक्यातील सर्व मंगल कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत अशी मागणी नागरीकांनी केली आहे.

ताज्या बातम्या

निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करा- राज्य निवडणूक आयुक्तांचे...

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai महानगरपालिका निवडणुकांसाठीचे मतदान आणि मतमोजणीकरिता पुरेशा प्रमाणात अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. या सर्वांचे वेळेत प्रशिक्षणही पूर्ण झाले पाहिजे; तसेच...