Saturday, May 18, 2024
Homeजळगावसप्ताह घडामोडी : शिक्षक बदल्यांना मुहूर्त गवसेना!

सप्ताह घडामोडी : शिक्षक बदल्यांना मुहूर्त गवसेना!

शिक्षक वर्ग हा ज्ञानदान करणारा आहे. तसेच भावी युवा पिढीचा पाया मजबूत करुन विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याची जबाबदारी शिक्षक वर्गावर आहे. आदराचे स्थान असलेल्या शिक्षकांच्या पाऊल वाटेवर फुलांऐवजी काटेरी वाटचाल सुरु आहे. कधी पगारासाीं तर कधी वैद्यकीय बिले मंजुरीसाठी फरफट होत आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागासह इतर विभागाच्या बदल्या झालेल्या आहेत. मात्र, आजपासून गुरुजींसाठी शाळा उघडूनही जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदल्यांचा मुहूर्त अद्याप गवसला नाही.

एकीकडे शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून नुकतीच शिक्षकांच्या जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्यांसाठी ऑनलाईन प्रणालीचे उद्घाटन झाले आहे. या पोर्टलवर आता प्रत्येक जिल्ह्यातून अवघड क्षेत्राचा डाटा भरण्याचे काम सुरू झालेले आहे. मात्र, शिक्षण विभागाच्या ढिसाळ नियोजन आणि दिरंगाईमुळे शिक्षकांच्या बदल्या प्रक्रिया ढिम्यागती सुरु आहे.

- Advertisement -

जिल्हा परिषदेच्या इतर विभागाच्या बदल्यांची लग्नघाई मे महिन्यातच उरकण्यात आलेली आहे. मात्र, शिक्षकांचा मोठा केडर असल्याचे कारण पुढे करीत शिक्षकांच्या बदल्या लांबणीवर पडल्या. दि.15 जूनपासून जिल्हा परिषदेच्या शाळांची घंटा वाजणार आहे. मात्र, शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षक बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे होते. मात्र शासनाने बदल्यांसाठी नवीन पोर्टल सुरू केल्याने ऑनलाईन बदल्यांसाठी या पोर्टलवर माहिती भरण्याचे काम उशिराने सुरू करण्यात आलेलेे आहे.

तसेच राज्यात कोविडचा प्रादुर्भाव असल्याने अनेक जिल्ह्यात संचमान्यता झालेल्या नाही. त्यामुळे शासनाने 2020-21 प्रमाणेच 21-22 च्या संचमान्यता कायम ठेवल्या असून त्या संचमान्यता विचारात घेवूनच यंदा बदल्याची प्रक्रिया राबवली जात आहे. तरीही शिक्षक बदल्यांचा तिढा अद्यापी सुटलेला नाही. जि.प.प्राथमिक शिक्षण विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे शिक्षक बदल्यांची प्रक्रिया रेंगाळल्याची चर्चा आहे. शाळा सुरु होण्यापूर्वी शिक्षक बदल्यांची कार्यवाही पूर्ण व्हावी, अशी अपेक्षा शिक्षक संघटनाकडून होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या