Monday, May 27, 2024
Homeभविष्यवेधसाप्ताहिक राशीभविष्य weekly Horoscope

साप्ताहिक राशीभविष्य weekly Horoscope

मेष – ठोस निर्णय घेऊ शकाल

मनाला प्रसन्न असे वातावरण. हा आठवडा पारिवारिक सौख्य वाढवणारा राहील. आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईल. नोकरदारांसाठी हा दिलासा देणारा काळ आहे. नोकरीसाठी करीत असलेल्या प्रयत्नांस यश प्राप्त होईल. गुंतवणूक करताना काळजी घ्यावी. गृहसजावटीच्या वस्तू खरेदी करू शकाल. मानसिक संतुलन ढासळले जाण्याची शक्यता आहे. महत्वाच्या कामात ठोस निर्णय घेऊ शकाल. कुटुंबातील महत्वाच्या लोकांची जबाबदारी घ्यावी लागेल.

- Advertisement -

शुभ तारखा : 13,14,15,16

वृषभ – न्यायालयीन कामकाजात यश मिळेल

आठवड्याच्या सुरुवातीला कोणताही मोठा व्यवहार करणार असाल, तर त्याबाबतीत व्यवस्थित शहानिशा करावी. आर्थिक नुकसान वाढण्याची शक्यता आहे. शेतकर्‍यांसाठी अनुकूल काळ आहे. शेतीविषयक महत्वाची कामे उरकून घेण्याचा प्रयत्न करा. विविध खाद्य पदार्थाबाबत रुची निर्माण होईल. न्यायालयीन कामकाजात यश प्राप्त होईल. परदेशातील व्यवहार सुरळीत होतील. कौटुंबिक जीवनात आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागेल. महत्वपूर्ण कामकाजाबाबत गुप्तता बाळगणे हितकारक राहील. मानसिक उद्विग्नतेमुळे हातात घेतलेल्या कामाला विलंब होण्याची शक्यता आहे. पायाच्या संबंधित विकारावर उपचार करणे भाग पडेल. शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता असल्यास त्वरित निर्णय घ्यावा. हॉटेल व्यवसायात तेजी आणून देणारा हा आठवडा असेल.

शुभ तारखा : 13, 14, 15

मिथुन – पारिवारिक स्नेह संबंधात सुधारणा

वडिलोपार्जित स्थावर मालमत्ता विषयक व्यवहार सुरळीत होण्यास मदतगार ग्रहस्थिती आहे. आर्थिक व्यवहार जैसे थे रहातील. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. उधार देणे घेणे दोन्हीही प्रकारचे व्यवहार करताना न करणे उत्तम राहील. शेतकर्‍यांसाठी दिलासादायक काळ आहे, लौकिक मानसन्मान प्राप्त होईल. राजकीय पटलावर होणार्‍या उलाढाली दिशादर्शक ठरतील. पारिवारिक स्नेह संबंधात सुधारणा होईल. व्यापार उदयोगातील तुम्ही बांधलेले आडाखे यशस्वी होतील . आप्तेष्टांकडून सहकार्य होईल. वाहन चालवताना काळजी घ्यावी. दूरचे प्रवास टाळावेत. न्याय हक्कासाठी लढा द्यावा लागेल.

शुभ तारखा : 15, 16, 17

कर्क – कायद्याची बाजू व्यवस्थित समजून घ्या

गेल्या काही काळापासून प्रलंबित असलेल्या कामाला वेळ मिळेल. मनाला आनंद देणार्‍या गोष्टी घडतील. अचानक वाढणार्‍या खर्चामुळे आर्थिक ताळेबंद बिघडणार नाही याबाबत सतर्क असावे. आपल्या वर्तणुकीबाबत केल्या गेलेल्या आरोपांनी विचलित व्हाल. कायदेशीर विषय हाताळताना कायद्याची बाजू व्यवस्थित समजून घ्यावी. शारीरिक स्वास्थ्य उत्तम रहाण्यासाठी योग्य काळजी घ्यावी. मित्र परिवाराकडून उचित सहकार्य मिळेल. अचानक खर्च वाढू शकतात. हितशत्रूंच्या कारवायांनी त्रस्त व्हाल. इष्ट देवतेची उपासना करणे लाभप्रद ठरेल. शर्थीचे प्रयत्न केल्याने ध्येय पूर्तीकडे वाटचाल सुरु होऊ शकेल.

शुभ तारखा : 13,14,17

सिंह -आर्थिक परिस्थितीत साधारण बदल

आपण हाती घेतलेल्या कामातून फायदा होईल. उद्योग क्षेत्रात उन्नती होण्यासाठी अनुकूल ग्रहस्थिती आहे. नवीन प्रशिक्षण घेणार्‍यासाठी हा कालावधी अत्यंत महत्त्वाचा आहे. लेखक, पत्रकार यांनी केलेले लेखन सामाजिक संदेश देणारे ठरेल. घरातील ज्येष्ठ मंडळींनी दिलेला सल्ला लाख मोलाचा ठरेल. परंपरेचा सन्मान वाढेल अशी कृती आपल्या हातून घडून येईल. आर्थिक परिस्थिती साधारण बदलती राहील. आठवड्याच्या उत्तरार्धात महत्वपूर्ण निर्णय घ्याल. कौटुंबिक जीवनात आनंद प्राप्त होईल. व्यवहारात आर्थिक नुकसान वाढण्याची शक्यता आहे. नेत्रविकाराने त्रस्त व्हाल.

शुभ तारखा: 13 ते 16

कन्या -आर्थिक लाभ होतील

आपण जर राजकारणात सक्रिय असाल, तर विरोधक वाढणार नाहीत याबाबत काळजी घ्यावी. आपण घेतलेल्या जबाबदार्‍या पार पाडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागतील. ध्येय गाठण्यासाठी केलेल्या परिश्रमाची दखल जनसामान्यांमध्ये घेतली जाईल. आर्थिक लाभ होतील. इमारत निर्माण व्यवसायात असाल तर उत्तम ग्राहक मिळेल, व्यवहार सुरळीत होतील. कमजोर विचार सरणीच्या लोकांपासून सावध रहावे. आठवड्याच्या उत्तरार्धात नुकसान होण्याची शक्यता आहे. आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे. तुमचे निर्णय दुसर्‍यावर लादण्याचा अट्टाहास करू नका. आर्थिक बाबतीत नियोजन करण्याची आवश्यकता आहे. व्यापार उदयोगातील तुम्ही बांधलेले आडाखे यशस्वी होतील.

शुभ तारखा: 13, 17

तूळ – घरातील वातावरण मंगलमय होईल

मनावर ताबा राहील याची काळजी घ्यावी. वयोवृद्ध मंडळींनी विकारांवर योग्य उपचार करून घेणे हिताचे ठरेल. परदेश गमन योग संभवतो. नोकरीत स्थानांतर संभवते. सरकार दरबारी मानसन्मान प्राप्त होण्याचे योग आहेत. न्यायालयीन कामकाजात यशाच्या दिशेने वाटचाल सुरू कराल. भावंडांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. घरातील वातावरण मंगलमय बनून राहील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. वाहन चालवताना काळजी घ्यावी. दूरचे प्रवास टाळावेत. न्याय हक्कासाठी लढा द्यावा लागेल.

शुभ तारखा: 12 ते 16

वृश्चिक -वाहन खरेदीचे व्यवहार पूर्ण कराल

आपल्या मनातील संकल्पनेला मूर्तरूप प्राप्त होईल. आपण करीत असलेल्या कामकाजास सामाजिक पसंती मिळून व्यापार उद्योगात भरभराट होईल. विवाह इच्छूकांचे विवाह ठरतील. विशेष करून स्त्रियांना हा आठवडा अत्यंत सकारात्मक राहील. मित्रमैत्रिणीच्या भेटी गाठी होतील. वाहन चालवताना काळजी घ्यावी. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असाल तर, आपली कोणितरी प्रशंसा करावी, या विचार धारेपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करा.

शुभ तारखा: 13,14,17

धनू -भागीदारकडून सहयोग मिळेल

या आठवड्यात मातुलाकडील नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. उत्पन्नाचे नवीन मार्ग निर्माण होतील. आपसातील विवादाच्या विषयावर मध्यस्थीने तोडगा निघेल. भागीदारकडून सहयोग मिळेल. पित्त प्रकृतीच्या मंडळींनी आरोग्यविषयक काळजी घ्यावी. शारीरिक कमजोरी देखील निर्माण होण्याची शक्यता आहे. आपण केलेल्या कर्तृत्वाला राजमान्यता मिळवण्यासाठी अथक परिश्रम करण्याची आवश्यकता आहे.

शुभ तारखा : 15 ते 18

मकर – गुंतवणूक करताना काळजी घ्या

धोरणात्मक निर्णय कराल. विद्यार्थ्यांसाठी अत्यंत दिलासादायक वातावरण तयार होईल. संततीविषयक प्रश्न मार्गी लागतील. वडीलधार्‍या व्यक्तींचे मार्गदर्शन उपयोगी पडेल. काही प्रमाणात खर्चही वाढण्याची शक्यता आहे. आर्थिक गुंतवणूक करताना काळजी घ्यावी. आरोग्यविषयक किरकोळ तक्रारी येतील. शस्त्रक्रियाही होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील.

शुभ तारखा : 13,14, 17

कुंभ -जवळचे प्रवास घडतील

हा आठवडा महत्वपूर्ण उलाढालीचा राहील. व्यावसायिक संबंध अधिक घट्ट होतील. वाहन खरेदी तसेच स्थावर इस्टेटीच्या खरेदी विषयी सकारात्मक वातावरण तयार होऊन बहुधा व्यवहार पूर्णत्वास देखील जातील. संततीकडून अपेक्षा पूर्ण झाल्याचा आनंद प्राप्त होईल. जवळचे प्रवास घडतील. तीर्थक्षेत्राच्या दर्शनाला जाण्याचे योग्य आहेत. भविष्यातील घडामोडींचे पूर्व संकेत मिळतील. उधारी वाढणार नाही याची काळजी घ्या.

शुभ तारखा : 15,16

मीन – घरातील व्यवहार सुरळीत चालतील

सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. नोकरदारांना बदलीचे योग संभवतात. भावंडांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. गृहसौख्य लाभेल. साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो, योग्य ती काळजी घ्या. घरातील व्यवहार सुरळीत चालतील. घर खरेदीसाठी उत्तम काळ आहे. नवीन कामकाज सुरु करण्याच्या प्रयत्नात असाल तर त्या व्यवहारास चालना मिळेल. कोणतेही काम करताना तज्ज्ञांचा अथवा थोरांचा सल्ला घेऊनच करा. विद्यार्थ्यांना कला क्रीडा क्षेत्रात उन्नती करण्यासाठी अनुकल काळ आहे.

शुभ तारखा : 13,14,17

- Advertisment -

ताज्या बातम्या