ज्यो. श्री रवींद्र भगवान पाठक – (ठाणे, मुंबई) 9869575547
मेष – कौटुंबिक जीवनात व्यस्त रहाल
धार्मिक परम्परा जपण्यासाठी प्रयत्नशील रहाल. आपल्या सात्विक भावनेचा लोक आदर करतील. आपण शब्दबद्ध केलेले काव्य इतरांना स्फूर्ती देणारे ठरेल. हाती घेतलेल्या कामास होणारा विलंब मानसिक संतुलन ढासळण्यास कारण बनू शकेल. आपण पूर्वी केलेली गुंतवणूक या काळात उपयोगी पडेल. कौटुंबिक जीवनात व्यस्त रहाल. विवाह इच्छूकासाठी हा काळ आनंदाची बातमी देणारा ठरेल. व्यवसायात भागीदाराकडून उत्तम सहकार्य लाभेल. शुभ तारखा: 18,19,22,23
वृषभ – वाहनापासून नुकसान संभवते
आयुष्यातील समीकरण बदलतील. नविन विषयाचे अभ्यासात रस निर्माण होईल. संततीकडून अपेक्षा पूर्ण झाल्याचा आनंद प्राप्त होईल. विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. शस्त्रघातापासुन स्वतःचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करा. भागीदार, मित्रपरिवार यांकडून उत्तम सहकार्य लाभेल. आपण जर बँक व्यावसायिक असाल तर मोठमोठे व्यवहार हाताळण्यात यशस्वी व्हाल. वाहनापासून नुकसान संभवते.शुभ तारखा: 20,21
मिथुन – परिश्रम वाढवणारा काळ
नोकरदारांना परिश्रम वाढवणारा हा काळ आहे. विचलीत मनःस्थिती संकटाना आमंत्रण देणारी ठरेल. घरगुती विषय चव्हाट्यावर येणार नाहीत याबाबत खबरदारी घ्यावी. विशेष करून आईच्या आरोग्याबाबत काळजी घेणे गरजेचे आहे. वाहन खरेदी करण्यासाठी थोडा संयम बाळगणे हिताचे ठरेल. पत्रकार, लेखक, कवी यासारख्या मंडळींसाठी हा आठवडा सकारात्मक घटना घडविणारा राहील. शारीरिक कमजोरी किंवा साथीचे रोग यासारखे विकार उद्भवण्याची शक्यता आहे. शुभ तारखा: 20,21
कर्क- भाग्योदयातील अडथळे दूर होतील
हा आठवडा कुटुंबाचे व्यवस्थापन करण्यात व्यस्त जाऊ शकतो. आप्त स्वकीयांमध्ये स्नेहभाव वृद्धिंगत होईल. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी उत्तम काळ आहे. मात्र वस्तू किंवा धातुरुपातील गुंतवणूक नुकसानीची ठरू शकते. नोकरदारांना बदली-पदोन्नती-प्रतिष्ठा वाढविणारा काळ आहे. भाग्योदयातील अडथळे दूर होतील. न्यायालयीन कामकाजात यशाच्या दिशेने वाटचाल सुरू कराल. भविष्यात घडणार्या घटनांचा अचूक अंदाज व्यक्त करू शकाल.शुभ तारखा: 18,19,22,23
सिंह – गुंतवणूक करणे टाळा
अनेक दिवसांपासून अपूर्ण अवस्थेत असलेल्या कामकाजास सुरुवात होऊ शकेल. आपल्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या प्रकल्पांना सामाजिक स्तरांवर मान्यता प्राप्त होईल. विशेषतः शेतीविषयक केलेली संशोधन लोकोपयोगी ठरतील. गुंतवणूक करण्यासाठी हा आठवडा उपयुक्त नाही. नेत्रविकार वाढण्याची शक्यता आहे. घरासाठी आवश्यक अशा साधनसामग्रीची खरेदीचा बेत आखला जाईल. शुभ तारखा: 18 ते 21
कन्या – व्यावसायिक उन्नतीेचे योग
कोणीतरी वापरलेल्या धक्कातंत्रामुळे मानसिक कमजोरी निर्माण होईल. रक्तदाब किंवा मांसपेशींच्या संबंधीत विकार वाढण्याची शक्यता आहे. वयोवृद्ध मंडळींनी आरोग्यविषयक काळजी घेण्याची आवश्यकता आहे. मित्र परिवाराकडून अपेक्षित सहकार्य मिळाल्याने कमीअधिक प्रमाणात दिलासादायक स्थिती निर्माण होईल. कामधंद्याच्या निमित्ताने प्रवास करावा लागेल. व्यावसायिक उन्नतीसाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. शुभ तारखा : 18 ते 23
तूळ – धनसंचय करू शकाल
आपला स्वभाव अधिक भावनिक बनण्याची शक्यता आहे. आप्तेष्ट मंडळींसाठी केलेले कार्य सन्मान वाढवणारं ठरेल. या आठवड्यात आर्थिकदृष्ट्या घेतलेले कोणतेही निर्णय नुकसानीचा सौदा ठरण्याची शक्यता आहे. विविध खाद्य पदार्थाविषयी आवड निर्माण होईल. समाज मनावर अधिराज्य गाजवाल. इंजिनिअरिंग क्षेत्रात नवीन अविष्कार सादर करू शकाल. उत्तमप्रकारे धनसंचय करू शकाल. या आठवड्यात श्रीसूक्ताचे पठण केल्यास संकटांवर मात करण्यास मदत होईल.शुभ तारखा : 20,21,22,23
वृश्चिक – वरिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य
आपण आपल्या कामाबद्दल केलेली वाच्यता घातक ठरण्याची शक्यता आहे. छोटी चूक सुद्धा मोठे दुष्परिणाम देण्याची शक्यता नाकारता येत नाही. परदेशातील हितसंबंध सांभाळून ठेवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागेल. वरिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य प्राप्त होईल. कामकाजात स्वीकारलेले नवीन धोरण कमी परिश्रमातून अधिक लाभ मिळवून देईल. उधारी वाढणार नाही याबाबत काळजी घ्यावी. शुभ तारखा : 18,19,22,23
धनू – गुंतवणूक करू शकाल
सद्गुरुंचे हितोपदेश कामी येतील. या आठवड्यात राजकीय क्षेत्रात सम्मान प्राप्त होऊन पदभार दिला जाऊ शकतो. विजयश्री प्राप्त करू शकाल. पारिवारिक स्नेहसंबंध सुधारतील. मोठी गुंतवणूक करू शकाल. मात्र तेल, इमारत निर्माण या क्षेत्रात गुंतवणूक करणे टाळावे. इतरांना केलेले मार्गदर्शन त्याच्या जीवनात परिवर्तन करणारे ठरेल. धार्मिक अनुष्ठान अथवा तत्सम विधिविधान आत्मोन्नतिसाठी उत्तम उपाय ठरू शकेल. अचानक निर्माण होणार्या समस्यावर मात करण्यासाठी मानसिक तयारी असावी.शुभ तारखा: 18,19,20,21
मकर – मित्रांचे मौलिक सहकार्य लाभेल
धर्म जागृतीसारख्या विषयासाठी वेळ द्याल. अन्नदान अथवा लोकोपयोगी कार्यात खर्च कराल. आत्मिक शांति साठी विविध उपाय योग-याग-नामस्मरण यासारख्या गोष्टीकडे कल वाढेल. मंदिर जीर्णोद्धार अथवा समाज मंदिराच्या निर्मितीसारखे विषयांत रस निर्माण होईल.आपल्या कामातील सहकारी मित्रांचे अनमोल सहकार्य लाभेल. व्यापार उद्योगासाठी सकारात्मक वातावरण तयार होईल. भांडवली बाजारात केलेली गुंतवणूक फ़ायदेशीर राहिल. शुभ तारखा: 18 ते 23
कुंभ – वयोवृद्धांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी
कोणत्याही विषयावरील अतिविश्वास घातक ठरू शकतो. मित्र मैत्रीणीमधील दुरावा मनस्ताप वाढ़विणारा असेल. वाहना संबंधित कोणतेही व्यवहार अभ्यासुनच करा. घरातील वयोवृद्ध मंडळींच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. आठवड्याचा उत्तरार्ध दिलासादायक राहील. तुमच्या अनिर्णयीत प्रश्नाला उत्तर मिळून समाधान लाभेल. भाग्योदयातील अडथळे दूर होतील. शैक्षणिक साधन सामग्री, कॉम्प्युटर यासारख्या व्यवसायाचा संबंध असल्यास अधिक प्रगती होईल. शुभ तारखा: 20,21,22,23
मीन – कौटुंबिक वातावरण आनंददायक
मोठमोठे निर्णय घेण्यास समर्थ अशी मनःस्थिती निर्माण होईल. आर्थिक उलाढाली बाबतचा आलेख समाधानकारक राहील. बँकिंग क्षेत्रात केलेल्या कामगिरी बद्दल सन्मानित केले जाण्याची शक्यता आहे. भागीदाराकडून अतुलनीय सहकार्य लाभल्याने समूहास शोभेल अशी कामगिरी घडेल. कौटुंबिक जीवनात आनंददायक वातावरण राहील. पारिवारिक सुखाची व्याख्या समजून येईल. पाण्यापासून सावध रहावे. भविष्यासाठी उपयुक्त कार्यशाळेत सहभागी व्हावे लागेल. शुभ तारखा : 18,19,22,23