Tuesday, November 26, 2024
Homeभविष्यवेधसाप्ताहिक राशीभविष्य : 31 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2023

साप्ताहिक राशीभविष्य : 31 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2023

मेष : स्पर्धेत यश मिळेल

या आठवड्यात काहीतरी खास होणार आहे. राजकारणातली आवड उच्च स्थानावर पोहोचायला साहाय्यभूत ठरेल. स्पर्धेत यश मिळेल, साहित्य, संगीतातील आवडीचा फायदा होईल. तब्येतीची काळजी घ्या. महिन्याच्या पूर्वार्धात खर्च अधिक होईल, ज्यामुळे धन संचयात अडचण निर्माण होईल. राहते घर व जमिनीसंबंधीच्या कामात स्थिती अनुकूल राहील. नवीन कामे, योजनांच्या बाबतीत स्थिती लाभदायक राहील. नोकरीत आणि व्यापारात उत्साह दिसून येईल. नोकरीत प्रमोशन होण्याची शक्यता आहे. शुभ तारखा : 1, 2

- Advertisement -

वृषभ : खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा

कोणतेही काम करण्याआधी नीट विचार करा. तब्येतीची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. मित्रांच्या मदतीशिवाय यश मिळणे सोपे नाही, यासाठी त्यांच्याशी चांगले संबंध ठेवा. देवाची आराधना करा, यामुळे आपले चित्त शांत राहील आणि येणारे दिवस त्रासदायक ठरणार नाहीत. एखादे महत्वाचे काम करायचे असल्यास त्याची जबाबदारी अंगावर पडेल. ती पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करा. महत्त्वाच्या कामांमध्ये सुरळीतरीत्या सहयोग मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. मान-सन्मानात इच्छानुरूप वाढ होईल. आरोग्य नरम-गरम राहील. पत्नीच्या आरोग्याची चिंता होईल. प्रवास काळजीपूर्वक करा. प्रेम संबंधांमध्ये स्थिती होकारात्मक राहील. मित्रांच्या मदतीने कार्ये पूर्ण होतील.शुभ तारखा : 2, 4,5

मिथुन : खरेदी करताना काळजी घ्या

थोडा कठिण काळ आहे. आपण कार्यक्रमांप्रती अरूची अनुभव कराल. मेहनत केली तरी फळ न मिळाल्यामुळे आलेल्या उदासीनतेमुळे तुमचे मन चिंतित राहू शकेल. अति विश्वासाच्या बदल्यात तुम्हाला धोका मिळू शकतो. रागावर संयम ठेवा. आपण काय बोलतोय याकडे लक्ष द्या. कुणाचे मन दुखावेल असे वक्तव्य करणे महागात पडेल. खरेदी करताना नीट काळजी घ्या. विक्री करताना समोरच्या व्यक्तीची चौकशी करून निर्णय घ्यावा. कौटुंबिक समस्या निर्माण झाल्याने मनात असंख्य विचार घर करतील. आरोग्याची काळजी घ्या. व्यस्तता जास्त राहील. कौटुंबिक विषयांमध्ये धनाचे व्यय होईल. शुभ तारखा : 4, 5, 6

कर्क : शुभ वार्ता मिळेल

अडलेली कामे मार्गी लागतील. समवयस्क लोकांसोबत प्रेमभाव वाढेल. नोकरीचे नवे योग जुळत आहेत. ऑफिसमध्ये कोणीतरी तुमच्याविरुद्ध कट रचत आहे, सावध राहा. मैत्री प्रेमात बदलण्याचे संकेत आहेत. विश्वास ठेवा, सर्व काही चांगले होईल. अनेक जुन्या कटु आठवणी पुन्हा त्रास देण्याची शक्यता असल्याने वर्तमानाचा विचार करा. नोकरीत आणि व्यापारात उत्साह दिसून येईल. नोकरीत प्रमोशन होण्याची शक्यता आहे. मिळेल. व्यवसायात साहस दाखवण्याचा प्रयत्न कराल.शुभ तारखा : 3, 4, 6

सिंह : अस्वस्थता वाढेल

आठवड्याच्या पूर्वार्धात नवे काम सुरू करणे टाळा. व्यापारी वर्गाला असंख्य अडचणींचा सामना करावा लागेल. दीर्घ प्रवास विशेष फायदेशीर ठरणार नाही. आरोग्यही ठीक राहणार नाही. नोकरदार लोकांना आपल्या सह-कर्मचारींच्या कट-कारस्थानांचा सामना करावा लागेल. अस्वस्थता वाढवणारा आठवडा आहे. नवीन रोग जडतील. व्यसनांपासून दूर रहा. मानसिक अस्वस्थता कायम राहील. आपल्या निर्णयावर ठाम रहा. तुमच्यातील सहनशिलता या महिन्यात फायद्याची ठरेल. रखडलेले काम मार्गी लागेल. कामे धाडसाने करा. शुभ तारखा : 2, 3, 5

कन्या : आर्थिक व्यवहारात पारदर्शकता ठेवा

जीवनात मोठी उलथापालथ होणार आहे. नशीबाची गाडी थांबून थांबून पुढे सरकत आहे. कुठेतरी काहीतरी अडथळा आहे जो तुम्हाला पुढे जाण्यापासून रोखतो आहे. मित्र तुम्हाला मदत करण्यासाठी कायम तत्पर राहतील. जोडीदाराचे हेकेखोर वागणे मानसिक तणाव वाढवेल. नोकरदार लोकांचे बॉसशी पटणार नाही. आरोग्यही साथ देणार नाही. एकुणातच हा आठवडा शुभ फ़ळ देणार नाही. आर्थिक व्यवहार करताना त्यात पारदर्शकता ठेवा. व्यक्तीगत स्वार्थापासून दूर रहाण्याचा प्रयत्न करा. प्रवास योग संभावतो. नवीन कामे, योजना लाभदायक ठरतील. नवीन संधी मिळतील. नोकरदार कामात व्यस्त राहतील. आरोग्याची काळजी घ्या. थोडा वेळ आपल्या आवडीच्या व्यक्तीबरोबर घालवू शकता. शुभ तारखा : 1, 5

तूळ : विचार गुप्त ठेवा

जीवनात प्रगती करण्यासाठी आपल्याला सहाय्याची गरज आहे. उच्च पदावर असलेल्या एखादा व्यक्तीसोबतच्या खाजगी ओळखीचा लाभ होईल. व्यापारात नवे दरवाजे तर उघडतील, पण या संधीसाठी तुम्हाला सतर्क राहावे लागेल. वाहन वगैरे चालवताना जरा सावधानी बाळगा. या राशीच्या व्यक्तींच्या विचारात सातत्याने बदल होत असतात. स्वत:चे विचार इतरांसमोर न मांडता ते गुप्त ठेवणे, एखाद्या घटनेचा धूर्तपणे विचार करणे अशा काही सवयीही या राशीच्या व्यक्तींमध्ये दिसून येतात.

शुभ तारखा: 3, 4, 5

वृश्चिक : मानसन्मानात वाढ होईल

कुणावरही डोळे बंद करून विश्वास करू नका. वाहन किंवा मशीनरी चालवताना सावधगिर बाळगा कारण अपघात होण्याची शक्यता आहे. मानसिक संतुलन ठीक असल्याने कोणीही तुमची फसवणूक करू शकत नाही. मानसन्मानात वाढ होईल. व्यापार-व्यवसायात उत्तम स्थिती राहील. तीव्र वेगाने टाकलेली पावले आपणास प्रतिस्पर्ध्यांकडे ओढतील. नवीन जबाबदार्‍या आपल्यासाठी ताण आणि काळजीचे कारण बनू शकतात. थंड आणि शांत राहण्याचा प्रयत्न करा. शुभ तारखा : 5, 6

धनू : धनप्राप्ती होण्याची शक्यता

जर तुम्ही कोणाला उधार पैसे दिले असतील तर ते वेळेवर परत मिळण्याची शक्यता आहे. या आठवड्यात तुम्हाला बचतीकडे लक्ष द्यावे लागणार आहे. तुम्हाला पेपर वर्कमध्ये सावधगिरी बाळगावी लागणार आहे. घरात शुभ प्रसंगाचे आयोजन होऊ शकते. प्रवास किंवा मनोरंजनाच्या साधनांवर पैसे खर्च होतील. धनप्राप्ती होण्याची शक्यता आहे. ग्रहांची तुम्हाला साथ मिळणार आहे. शुभ तारखा: 5, 6

मकर : वाहन खरेदीेचे योग

आठवड्याच्या सुरुवातीस तुमच्या जीवनात शुभ प्रसंगांची झडी लागणार आहे. घरात होणार्‍या शुभ आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये तुम्ही व्यस्त राहणार आहात. या आठवड्यात तुमच्या मिळकतीच्या स्रोतांमध्ये वृद्धी होणार आहे. नोकरी करणारे लोक आपल्या मिळकतीत वाढ करण्यासाठी रिकाम्या वेळेचा सदुपयोग करतील. स्थायी मालमत्ता आणि वाहन खरेदीचे प्रबळ योग आहे. शुभ तारखा: 3, 4,

कुंभ : आरोग्याची काळजी घ्या

मान सन्मानात वाढ होईल. सामाजिक जीवन आणि घरात देखील तुमचा मान वाढेल. समाज आणि मित्र मंडळात तुमच्या कामाची प्रशंसा होईल आणि त्यांची तुमच्याकडे पाहण्याची दृष्टी बदलून जाईल. योग्य विचार करून कार्य करा. निष्कारण प्रश्नांचा त्रास राहील. आरोग्याची काळजी घ्या. या आठवड्यात तुमची नवीन लोकांशी ओळख होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या मध्यम चरणात तुमच्या मिळकतीचे स्रोत वाढण्याची शक्यता आहे. शुभ तारखा: 2, 4, 5

मीन : वायफळ खर्च टाळा

भाग्यावर अवलंबून राहू नका, कारण जे काही कमवाल ते फक्त तुमच्या मेहनतीमुळेच मिळणार आहे. या आठवड्यात कठीण परिश्रमासाठी तयार राहा. या आठवड्यात मिळकतीपेक्षा खर्च जास्त राहण्याची शक्यता आहे. म्हणून वायफळ खर्च करणे टाळा. अन्यथा तुमची आर्थिक स्थिती मंदावेल व तुम्ही मानसिक व्याकुलतेचा शिकार व्हाल. शुभ तारखा: 4,5,6

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या