Saturday, November 2, 2024
Homeभविष्यवेधसाप्ताहिक राशीभविष्य : 3 ते 9 ऑगस्ट 2023

साप्ताहिक राशीभविष्य : 3 ते 9 ऑगस्ट 2023

मेष : विद्यार्थ्यांसाठी अनुकूल काळ

व्यक्तिगत आणि व्यावसायिक गरजेना पूर्ण करण्यासाठी तुम्ही नवीन वस्तूची खरेदी करण्याचे मन बनवाल. पण तुम्ही त्याचे आनंद घेण्यास चुकाल. व्यवसायात तुम्हाला सरकारी कारणांमुळे काही अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. भौतिक सुख सुविधेत वाढ होईल, पण तुम्ही मानसिक व्याकुळतेमुळे त्याचा आनंद घेण्यास मुकणार आहात. 4 ते 6 तारखेपर्यंत तुम्ही तुमच्या मुलांकडे अधिक लक्ष द्याल. विद्यार्थी वर्गासाठी हा काळ अनुकूल आहे. कुटुंबासहित सहलीचे आयोजन कराल.

- Advertisement -

शुभ तारखा : 3, 4, 5

वृषभ : गुंतवणूक कराल

शैक्षणिक यशामुळे शाळा, कॉलेज किंवा समाजात सन्मान मिळण्याची शक्यता आहे. सर्वश्रेष्ठ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती पुरस्कार मिळणार आहेत. जोडीदाराचे आरोग्य काळजीचा विषय बनेल. व्यवसायात या आठवड्यात उत्तम कामगिरी करणार आहात आणि त्यात तुम्ही गुंतवणूक कराल. नोकरी करणार्‍या लोकांसाठी आठवडा फारच उत्तम जाणार आहे. या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी तुम्ही उत्तम वैवाहिक जीवनाचा सुख अनुभवाल. लग्नोत्सुक जातकांसाठी हा आठवडा फारच अनुकूल आहे. उद्योग असलेल्या जातकांना चांगला फायदा मिळणार आहे. नवीन मशीनरी किंवा जागा विकत घेऊ शकता. वाहनसुख लाभेल. वाहन चालविताना काळजी घ्या. अपघात होण्याची शक्यता आहे. परदेशातील नातेवाईकांकडून आनंदाची बातमी मिळेल. शुभ तारखा : 5, 6

मिथुन : आर्थिक टंचाई जाणवेल

व्यय स्थानाचा मालक मंगळ आणि कुटुंब स्थानाचा मालक सूर्य दोन्ही धन स्थानात युतीत असून दुसर्‍या घरात आहेत. व्यवसायात गुंतवणुकी- मुळे हात तंग राहू शकतो. बँक लोनचा हफ्ता आणि व्याज हे तुमच्या चिंतेचा विषय ठरणार आहे. आठवड्याच्या मध्यात थोडा धीर मिळेल. करियरसंदर्भातील नवी संधी मिळण्याची शक्यता. त्यामुळे घरात उत्साहाचे वातावरेण होईल. तुम्हाला तुमच्या ओळखीच्या लोकांकडून मदत मिळणार आहे पण ती तुमच्या गरजेपेक्षा फारच कमी राहणार आहे. शुभ तारखा : 4, 5, 6

कर्क : जोडीदाराच्या प्रकृतीमुळे काळजी

कुटुंबियांशी निगडित बाबींमध्ये सध्या समाधान होण्याची शक्यता फारच कमी आहे. काही प्रकरणांमुळे न्यायालयीन खटल्यात अडकण्याची शक्यता आहे.जोडीदाराच्या प्रकृतीमुळे तुम्ही काळजीत असाल. जर अस्वस्थ जाणवाल तर त्वरित डॉक्टरांना भेटा. डोळ्यांशी संबंधित आजार होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी वर्गाला त्यांच्या मेहनतीच्या बळावर परिणाम मिळतील. प्रवेश परीक्षांमध्ये देखील यश मिळेल. नोकरी करणार्‍या लोकांना जर नोकरीत बदल करायचा असेल तर विचार करावा.

शुभ तारखा : 5, 7

सिंड : आर्थिक जबाबदार्‍या वाढतील

आठवड्याची सुरुवात तुम्ही पूर्ण उत्साहाने कराल. तुमच्या लग्न स्थानात मंगळ आणि सुर्याची युती असेल, जेव्हाकी या स्थानाचा मालक बुध व्यय भावात आहे. विचारांमध्ये उग्रता येऊ शकते. या आठवड्यात तुमचा समाजात मान सन्मान वाढेल. कुटुंबात देखील तुम्हाला महत्त्व मिळेल. सरकारी अधिकारी आणि उच्चाधिकार्‍यांसोबत होणारी भेट तुम्हाला येणार्‍या भविष्यात चांगली फलदायी ठरणार आहे. प्रोफेशनल क्षेत्रात तुमचे संबंध उत्तम राहणार आहे. आर्थिक जबाबदार्‍या वाढतील. आत्मविश्वास वाढेल. कामात अडचणी येतील. आपली चूक स्वीकारावी लागेल. शुभ तारखा : 4, 6

कन्या : आरोग्याची काळजी घ्या

शेअर बाजार, मशीन आणि ब्रोकर सारख्या कार्यांमध्ये तुम्हाला लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. नोकरीच्या स्थानात शनी वक्री आहे यामुळे तुमच्या प्रत्येक कार्यांमध्ये विलंब आणि अडचणी येतील. विरोधकांमुळे जमीन, घर किंवा स्थायी मालमत्तेच्या प्रकरणात एखाद्या न्यायालयीन खटल्यात अडकू शकता. पारिवारिकदृष्ट्या वेळ सामान्य. कामाचा ताण जाणवेल. नोकरीत कुणावरही विश्वास ठेवू नये. अडचणी येतील. सतत परिश्रमाने आर्थिक लाभ होतील. कार्यकुशलतेचा लाभ मिळेल. पारिवारिक लाभ घ्या. नोकरीत विशेष सावधगिरी बाळगा. विश्वासात राहू नये. अनिश्चिततेचे वातावरण. निराशा वाढेल. प्रलोभनांना भुलू नका. शुभ तारखा : 3, 5, 7

तुळ : लांबणीवर गेलेले काम पूर्ण होतील

आर्थिक फायद्यासाठी हा आठवडा आधीपेक्षा उत्तम आहे. पण कमजोर पक्ष असा आहे की तुमच्या धन स्थानाचा मालक सूर्य आहे, जो व्यय स्थानात मंगळासोबत असल्यामुळे गैर जरूरी खर्च किंवा मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. या वेळेस तुम्हाला आधी केलेल्या गुंतवणुकीमुळे फायदा मिळू शकतो किंवा जर कोणाला पैसे उधार दिले असतील तर ते परत मिळण्याची शक्यता आहे, खास करून ते धन जे मिळण्याची उमेद तुम्ही पूर्णपणे सोडली असेल. या काळात लांबणीवर गेलेली बरीच कामे पूर्ण होतील आणि काही बाबींचे समाधान निघू शकतेे. शुभ तारखा : 4

वृश्चिक : मानसिक बेचैनी अनुभवाल

व्यक्तिगत आणि व्यावसायिक उद्देश्यासाठी नवीन वाहन खरेदीचे योग तयार होत आहे. घरात वस्त्र दागिने, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स, सुख सुविधा इत्यादी साधनांची खरेदी करू शकता. विद्यार्थी वर्गासाठी वेळ अनुकूल नाही आहे. दूरस्थ किंवा परदेशात राहत असलेल्या ओळखीच्या लोकांशी संपर्क वाढेल. आठवड्याच्या पहिल्या दिवशी तुम्ही मानसिक बेचैनी अनुभवाल. तुमची स्थिती डगमग राहील, म्हणून या वेळेस कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. शुभ तारखा : 5, 6

धनू : व्यर्थ ताण जाणवेल

आर्थिक फायद्यामुळे प्रसन्न राहाल. या वेळेस हातात जेवढे ही काम असतील ते पूर्ण होण्याची पूर्ण शक्यता आहे. हा आठवडा तुमच्यासाठी फारच लाभदायक ठरणार आहे. तुम्हाला तुमच्या व्यापारासाठी एक नवीन विश्वासू भागीदार मिळण्याची शक्यता आहे. विश्वास कमी राहील. व्यर्थ ताण जाणवेल. पारिवारिक वाद वाढतील. खर्च होईल. अडकलेल्या कामात सुधारणा होईल. निश्चितेने काम करा. शुभ तारखा: 3, 4, 5

मकर : धनलाभ होण्याची शक्यता

आठवड्याच्या सुरुवाती आणि शेवटचा टप्पा तुमच्यासाठी उत्तम आहे. परंतु मधला काळ थोडा कठिण जाणार आहे. आठवड्याच्या शेवटी तुमच्या स्थितीत थोडी फार सुधारणा येईल. जमीन, घर व स्थायी मालमत्ता विक्री केल्यामुळे धनलाभ होण्याची शक्यता आहे. नवीन गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगणे फारच आवश्यक आहे. आपल्या पावलांच्या खुणा दुसर्‍यांना मार्गदर्शक ठरण्याचा संभव आहे. शुभ तारखा: 4, 5

कुंभ : गैरसमज दूर होतील

कौटुंबिक बाबतीत विनम्रतेची वागणूक करून त्याचे समाधान काढा. शेयर बाजारात विचार करून गुंतवणूक करा. त्याशिवाय तुम्ही तुमच्या व्यवसायाला विस्तृत करण्यासाठी नवीन उपकार्यालय किंवा स्टोअर उघडू शकता. बायको किंवा मुलीच्या नावावर एखाद्या नवीन व्यवसायात गुंतवणूक केल्याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल. गैरसमज दूर होतील. आपल्या विवेक बुद्धिच्या उलट काम झाल्याने हानी होऊ शकते. नियंत्रण ठेवा. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. शुभ तारखा: 5, 7

मीन : आरोग्याकडे लक्ष द्या

पार्टनरशिप असलेल्या व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. भागीदारीत नवीन व्यवसाय सुरू करण्याचा योग जुळून येत आहे. विद्यार्थी वर्गासाठी हा आठवडा अनुकूल आहे. थोडी सावधगिरी बाळगा. या आठवड्यात आईच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच, स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष द्यावे लागणार आहे. तुमच्या उजव्या डोळ्या किंवा कानाचा त्रास होऊ शकतो. शुभ तारखा: 6, 7

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या