Tuesday, November 5, 2024
Homeभविष्यवेधसाप्ताहिक राशीभविष्य : 6 ते 12 जुलै 2022

साप्ताहिक राशीभविष्य : 6 ते 12 जुलै 2022

मेष : आत्मविश्वास टिकवून ठेवा

नेहमीच्या पद्धतीत बदल करणे तुम्हाला रुचत नाही. बदलत्या परिस्थितीमुळे तुमच्या कार्यपद्धतीत बदल करणे भाग पडेल. त्यातून नवीन शिकायला मिळेल. उद्योगधंद्यात बाजारातील चढउतार आणि स्पर्धकांच्या हालचाली यांचा ताळमेळ राखण्यासाठी तडजोड करावी लागेल. नोकरीत कामाचा ताण वाढेल. प्रकृतीकडे दुर्लक्ष झाले असेल तर त्यावर उपाय योजावा लागेल. विद्यार्थ्यांनी नवे प्रयोग टाळावेत. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास टिकवून ठेवला तर यश मिळेल. शुभ तारखा : 9,10,11

- Advertisement -

वृषभ : व्यापारात अचानक ऑर्डर मिळतील

कामाचा दर्जा उत्तम राखण्याकरता कार्यपद्धतीत बदल करण्याचा प्रयत्न करा. प्रकृतीस्वास्थ्य जपून कामाचे नियोजन करा. व्यापारधंद्यात उत्पादन आणि विक्रीचा वेग वाढवण्याचा इरादा असेल. पैशाची आवक चांगली राहिल्याने गरज भागेल. नोकरीत भरपूर काम कराल, पण स्वत:च्या मनाप्रमाणे वागणे पसंत कराल. विद्यार्थ्यांनी चांगल्या ग्रहमानाचा फायदा घ्यावा. घरामध्ये तात्त्विक मतभेद होतील. घरामध्ये मोठ्या व्यक्तींच्या कडक धोरणाचा जाच वाटेल. विद्यार्थ्यांना त्यांचे नेहमीचे तंत्र उपयोगी पडेल. घरातील व्यक्तींना दिलेले आश्वासन पाळावे लागेल. हव्या त्या पद्धतीने मनासारख्या गोष्टी नेहमीच घडत नाहीत. लांबलेल्या कामांना गती येईल. गुंतवणूक करताना काळजी घ्या. व्यापारउद्योगात अचानक चांगली ऑर्डर मिळाल्याने उत्साही बनाल.

शुभ तारखा : 10, 11, 12

मिथुन : सरकारी कामांना गती येईल

पूर्वी मिळालेल्या अनुभवाचा नजिकच्या भविष्यात उपयोग होईल. व्यापारात जी कामे लांबली होती त्यांना हळूहळू वेग येईल. मात्र सभोवतालच्या व्यक्तींचे बदलणारे मूड पाहून काम करावे लागेल. सरकारी कामांना गती येईल. या पारंपरिक पद्धतीच्या गुंतवणूक योजनेत तुमचे बचतीचे पैसे गुंतवलेत तर पैसा कमावू शकाल. नोकरीत वरिष्ठांपुढे तुमची अडचण व्यवस्थितपणे मांडलीत तर त्यातून ते मार्ग काढतील. कुटुंबातील आप्तांचे रुसवेफुगवे सहन करावे लागतील. त्याकरिता मध्यस्थांची मदत घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांनी चांगल्या ग्रहमानाचा फायदा घ्यावा. सोनेरी दिवसांच्या बालपणीच्या रम्य आठवणीत रंगून जाल. शुभ तारखा : 6, 7, 8

कर्क : मतलब साध्य कराल

हाताबाहेर गेलेल्या गोष्टी रुळावर येतील. तुमच्या कार्यपद्धतीत आणि विचारात बदल होईल. व्यवसायात ओळखीच्या व्यक्तींशी संपर्क साधून तुमचा मतलब साध्य कराल. नोकरीमध्ये संस्थेच्या गरजेला महत्त्व द्या. कामात बदल हवा असेल तर त्यादृष्टीने हालचाल करावी. घरामध्ये आनंददायी घटनेची चाहूल लागेल. वेगळ्या स्तरावर काम करण्याची संधी उपलब्ध होईल. तरुणांनी विवाहाचा निर्णय घाईने घेऊ नये. विद्यार्थ्यांनी अभ्यासावरची पकड ढिली करू नये. मानसिक, नैतिक शिक्षणाबरोबरच शारीरिक शिक्षण घेणेही संपूर्ण विकासासाठी आवश्यक ठरते. शुभ तारखा : 7, 8, 9

सिंह : कामात चालढकल कराल

सहनशीलतेच्या पलिकडे एखादी गोष्ट गेली तरच बंडखोर स्वभाव उफाळून येतो. या सप्ताहात असा अनुभव येईल. काही गोष्टी घडत नसतील तर त्यात पुढाकार घेऊन कामाच्या मागे लागाल. व्यापारात स्वत:चे अस्तित्व टिकविण्यासाठी जाहिरात आणि प्रसिद्धी माध्यमांचा वापर करावा लागेल. सरकारी कामे गती घेतील. कारखानदारांनी कामगारांशी मर्यादेपेक्षा जास्त मवाळपणाने वागू नये. नोकरीत युक्तीने कामात चालढकल कराल. घरामध्ये तात्त्विक मतभेद होतील. कलात्मक आनंद देणार्‍या कामात स्वत:ला गुंतवून घ्या पारंपरिक पद्धतीच्या गुंतवणूक योजनेत तुमचे बचतीचे पैसे गुंतवलेत तर पैसा कमावू शकाल. शुभ तारखा : 8, 9, 10

कन्या : नियोजित कामात बदल करा

तुम्ही नियोजन केलेल्या कामात अनपेक्षित बदल करावे लागतील. त्यामुळे तुमच्या कामाच्या पद्धतीत बदल करावा लागेल. कोणावरही विसंबून न राहता स्वत: कंबर कसून काम करावे लागेल. व्यापारात योग्य व्यक्तींची योग्य कामासाठी निवड करा. आर्थिक व्यवहारांवर काटेकोरपणे लक्ष ठेवा. नोकरीमध्ये कामाच्या रचनेत फेरफार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमचा ताण वाढेल. घरातील व्यक्तींना प्रोत्साहन द्याल. तरुणांना नवीन संधी खुणावतील. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल. तुम्हाला व्यक्त होण्यासाठीचा चांगला काळ आहे. क्रिएटीव्ह स्वरूपाच्या प्रकल्पावर काम करा. शुभ तारखा : 6, 7

तूळ : नेहमीपेक्षा जास्त काम कराल

एकीकडे घरगुती जबाबदार्‍या आणि दुसरीकडे व्यावसायिक कामांची गडबड. सर्व कामे एकट़्याने न करता इतरांवर विश्वास ठेवणे भाग पडेल. व्यापारात जादा कमाईच्या मोहाने न पेलवणारे काम स्वीकाराल. योग्य व्यक्तीची योग्य कामासाठी निवड करा. केलेल्या अभ्यासाचा विद्यार्थ्यांना फायदा होईल. नोकरीत नेहमीपेक्षा जादा काम करावे लागेल. त्यासाठी आवश्यक त्या सुविधा वरिष्ठ देऊ करतील. घरामध्ये प्रत्येकजण आपले तेच खरे करण्याचा प्रयत्न करतील. दिलेले आश्वासन पाळावे लागेल. विद्यार्थ्यांनी शंकांचे वेळीच निरसन करावे. शुभ तारखा: 11, 12, 13

वृश्चिक : पैशाची तरतूद करावी लागेल

काम आणि प्रकृती दोन्हींचे नियोजन केले तर तणाव जाणवणार नाही. व्यवसायधंद्यात कामाचे प्रमाण भरपूर असल्याने समाधान वाटेल. मात्र गिर्‍हाईकांना शब्द देण्यापूर्वी विचार करा. पैशाची तरतूद करावी लागेल. भागीदाराच्या संमतीशिवाय निर्णय घेऊ नये. नोकरीत ठरविलेले उद्दिष्ट साध्य करण्याकरिता मेहनत कराल. पण वरिष्ठांच्या बदलत्या सूचनांमुळे अडखळल्यासारखे होईल. घरामध्ये एकमेकांच्या विचारांची तफावत जाणवेल. विद्यार्थ्यांनी नवे प्रयोग टाळावेत. शुभ तारखा : 6, 8, 9

धनू : धाडसी निर्णय घेण्याची तयारी

तुमच्या प्रगतीला पूरक वातावरण लाभेल. पूर्वी काही कारणांमुळे रेंगाळलेल्या कामात योग्य उपाय सापडेल. त्यासाठी धाडसी निर्णय घेण्याची तुमची तयारी. व्यापारउद्योगात अचानक चांगली ऑर्डर मिळाल्याने उत्साही बनाल. जादा भांडवलाची गरज वाटेल. नोकरीत नेहमीच्या पद्धतीने काम न झाल्याने कामाची पद्धत बदलावी लागेल. तुमचे विचार घरातील व्यक्तींच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न कराल. शुभ तारखा: 11, 12

मकर : लांबलेल्या कामांना गती

तुमचे योग्य अंदाज आणि अपेक्षित व्यक्तींकडून मिळणारी साथ यामुळे तुमच्यातील कृतीशिलता वाढेल. सर्व आघाड़यांवर पुढे जायचा तुमचा मानस राहील. व्यापारात सरळ मार्गाने कामे होत नाहीत पाहून वेगळ्या मार्गाचा अवलंब करावासा वाटेल. जोडधंदा असणार्‍याना चांगली संधी लाभेल. नोकरीत नेहमीच्याच कामात तुमची धाडसी प्रवृत्ती दिसून येईल. लांबलेल्या कामांना गती येईल. शुभ तारखा : 7, 9, 10

कुंभ : सबुरीचे धोरण ठेवा

गेल्या काही महिन्यांत तुम्ही बरेच बेत केले असतील. ते सफल झाले नसतील तर त्या दिशेने वाटचाल कराल. आलेल्या अनुभवांचा विचार करून तुमच्या कार्यपद्धतीत बदल कराल. व्यवसाय-धंद्यात कामाचा वेग वाढवण्यासाठी ठोस उपाय योजाल. खेळत्या भांडवलासाठी विशेष कष्ट घ्यावे लागतील. नोकरीत हक्क आणि अधिकारासाठी लढा द्यावासा वाटेल. नव्या नोकरीचे निर्णय भावनेच्या भरात घेऊ नका. घरात तुमचे धोरण सबुरीचे ठेवा. शुभ तारखा : 9, 10, 11

मीन : कुटुंबात वादविवाद टाळा

अपेक्षेपेक्षा जास्त पैसे हातात आले की अनेक मनोकामना जागृत होतात. नीट नियोजन करून मगच पैशाचे वाटप करा. व्यापारात फायद्यासाठी जवळच्या व्यक्ती तुमची खुशामत करतील. नोकरीत अधिकाराचा प्रमाणाबाहेर जाऊन वापर करावासा वाटेल. सवलतींचा उपयोग योग्य कारणाकरिताच करावा. घरातील व्यक्तींशी क्षुल्लक कारणावरून हुज्जत घालू नका. केलेल्या अभ्यासाचा विद्यार्थ्यांना फायदा होईल. शुभ तारखा: 9, 13

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या