Friday, May 3, 2024
Homeजळगावशाळांमध्ये विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत!

शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत!

जळगाव । jalgaon

शासनाने दिलेल्य आदेशानुसार तब्बल दीड वर्षानंतर (After a year and a half) इयत्ता आठवी ते दहावीच्या (Eighth to tenth) विद्यार्थ्यांची (Students) शाळा सुरु (start school) करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार आज पासून जिल्हाभरातील शाळा सुरु झाल्या. दरम्यान शाळांतर्फे शिक्षणोत्सव (Education Festival) कार्यक्रम राबविण्यात आला. यामध्ये शाळांकडून विद्यार्थ्यांच्या शरिराचे तापमान मोजून नियमांची अंमलबजावणी करीत ढोल-ताशाच्या गजरात (sound of drums) गुलाब पुष्प देवून त्यांचे स्वागत (Welcome) करण्यात आले.

- Advertisement -

विद्यार्थ्यांचे केले औक्षण

विवेकानंद प्रतिष्ठान प्राथमिक शाळा वाघ नगर येथे इयत्ता 5 वी ते 8 वी च्या विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात, जल्लोषात स्वागत करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक हेमराज पाटील, समन्वयिका वैशाली पाटील व परिचारिका हर्षदा कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांचे औक्षण करून तसेच गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.

प्रत्येकाचा आठवणीचा दिवस असतो तो शाळेतील पहिला दिवस.म्हणूनच विवेकानंद प्रतिष्ठान प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले गेटजवळ विद्यार्थ्यांना सुरुवातीला सॅनिटायझर, थर्मल गन च्या साह्याने तापमानाची नोंद करण्यात आली. तसेच सर्व विद्यार्थ्यांनी मास्क लावलेले आहे की नाही याची सुद्धा तपासणी शिक्षकांनी केली.

शाळेचा पहिला दिवस असल्याने विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या प्रचंड आनंद दिसून येत होता. विद्यार्थी खूप उत्साहात होते या उत्साहपूर्ण वातावरणात विद्यार्थ्यांच्या अंगावर पुष्पवृष्टी करण्यात आली. शाळेत फुगे, फुले याद्वारे आकर्षक सजावट केलेली होती. यशस्वीतेसाठी सचिन गायकवाड यांनी परिश्रम घेतले.

विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देवून स्वागत

प्रगती शिक्षण मंडळ संचलित नवीन माध्यमिक विद्यालय, जळगाव शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक डॉ. रवींद्र माळी व नीलेश नाईक उपस्थित होते. शाळेतील नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे औक्षण करून गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने शाळा व वर्ग विविध प्रकारच्या *रांगोळ्या, रंगीबेरंगी फुगे व पताका* लाऊन सजवण्यात आले होते. विद्यार्थ्यांना शिक्षकांनी कोविड-19 संदर्भातील सर्व *उपाय योजनांची माहिती दिली. त्यानंतर वर्गामध्येच विद्यार्थ्यांचे विविध प्रकारचे बैठे खेळ घेऊन *आनंददायी वातावरण* तयार करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी तोंडावर मास्क लाऊन व सुरक्षित अंतर* ठेऊन खेळाचा आनंद घेतला. उपक्रमासाठी नरेंद्र वारके, वंदना नेहेते, रशिदा तडवी, श्रीकांत पाटील, राहुल धनगर, राजेंद्र पवार, सुवर्णा सोनार, संगीता निकम, भूषण बर्‍हाटे यांनी सहकार्य केले.

गोदावरी स्कुलमध्ये फुलांचा वर्षाव

गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएससी स्कूल जळगाव मध्ये आजपासून आठवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे आगमन झाले असून विद्यार्थ्यांवर स्कूलच्या प्रवेशद्वार जवळ फुलांचा वर्षाव केला गेला. याप्रसंगी गोदावरी स्कूलच्या प्राचार्या नीलिमा चौधरी यांनी सरस्वती पूजन केले. यावेळी सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. संपूर्ण कोरोनाजन्य परिस्थितीचा विचार करू आदल्या दिवशीच सर्व स्कूल परिसर सॅनीटाईज करण्यात आला. जागोजागी सूचना फलक लावण्यात आले. सोशल डिस्टंसिंगचे पालन व स्वच्छतेच्या नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांचे अतिशय प्रसन्न आणि प्रफुल्लित वातावरणात स्वागत करण्यात आले होते.

अभिनव विद्यालयात पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तकांचे वाटप

माहेश्वरी विद्याप्रसारक मंडळ संचलित अभिनव विद्यालयात इयत्ता 8वी ते दहावी पर्यंतचे वर्ग सोमवारपासून सुरु करण्यात आले. कोरोनाच्या पाश्वर्र्भूमिवर नियमांचे पालन करण्यावर भर देण्यात आला. मुख्याध्यापिका सरोज तिवारी यांनी गुलाबपुष्प देवून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर इयत्ता 8वी च्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना मास्कचेही वाटप करण्यात आले. यावेळी अश्विनी साळुंखे, ज्योती पाटील, निता पाटील, संतोष सपकाळे, गुरु बारेला, कुणाल बडगुजर, भूषण पाठक उपस्थित होते.

आर. आर. विद्यालय

आर. आर. विद्यालयात शिक्षणोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्याचे ढोल-ताशाच्या गजरात गुलाबपुष्पदेवून स्वागत करण्यात आले. शाळा सुरु होण्यापुर्वी शाळेच्या वर्ग खोल्या व संपुर्ण परिसर स्वच्छ करीत निर्जतुंक करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांचे स्वागत प्र- मुख्याध्यापक परेश श्रावगी, उपमुख्याध्यापक डी. टी. पाटील यांनी केले व विद्यार्थ्यांना आपली काळजी घेण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केली. तसेच विद्यार्थ्यांनी शाळेत येतांना आपल्या पालकाचे संमतीपत्र भरुन ते आपल्या वर्गशिक्षकांकडे जमा करण्याच्या सुचना त्यांना देण्यात आल्या. याप्रसंगी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

का. ऊ. कोल्हे विद्यालयात पुस्तके देवून विद्यार्थ्यांचे स्वागत

काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयात इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची शाळा सुरु करण्यात आली. कोरोनामुळे तब्बल दीड वर्षानंतर शाळा सुरु झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये देखील शाळेत येण्याबाबत उत्सुकता लागली होती. दरम्यान, प्रत्येक विद्यार्थ्याला गुलाबपुष्प व पुस्तके देवून त्यांचे स्वागत करण्यात आले. याप्रंसगी मुख्याध्यापिका जे. आर. गोसावी यांनी शासनाच्या नियमांविषयी विद्यार्थ्यांना माहिती देवून त्याचे पालन करण्याचे आवाहन यावेळी केले. कार्यक्रमाचे नियोजन पर्यवेक्षक एच. जी. काळे यांनी केले. यशस्वितेसाठी उपमुख्याध्यापक ए. व्ही. ठोसर, एस. डी. खडके, पुष्पा पाटील यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.

जानकीबाई आनंदराम बाहेती हायस्कूल

श्रीमती जानकीबाई आनंदरामजी बाहेती विद्यालयात शासनाच्या परवानगीनुसार इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी वर्ग सुरु करण्यात आले. विद्यालयाचे मुख्याध्यापक पी. आर. जाधव यांनी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देवून त्यांचे स्वागत केले. सुरुवातीला शिक्षिका सरला चौधरी, सुनिता महाजन यांनी कोरोनाच्या परिस्थितीनुसार व शासनाच्या नियमावलीप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याच्या शरिराचे तापमान व ऑक्जिसनची लेव्हल मोजली. त्यानंतरच प्रत्येक विद्यार्थ्याला शाळेत प्रवेश देण्यात आला. याप्रसंगी पी. एम. पवार, के. एच. पाटील, डी. जी. पाटील यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

महाराणा प्रताप विद्यालय

शहरातील महाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. सुरुवातीला विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. एस. पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रवेशद्वारावरच गुलाबपुष्प देवून त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मंगलमय वाद्याची धून वाजवून प्रवेशद्वाराजवळ रांगोळी काढण्यात आली होती. दरम्यान, शाळेत येणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्याचे शरिराचे तापमान मोजून त्याची ऑक्सिजन लेव्हलची तपासणी करण्यात आली. याप्रसंगी पर्यवेक्षक डी. बी. सोनवणे, प्रा. संजय पाटील, एस. व्ही. पाटील, मुकूंद वाणी, रेखा वाणी, समिधा सोवनी, मायाश्री पाटील, विष्णू साबळे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या