Wednesday, December 4, 2024
Homeमुख्य बातम्याउत्साहात होणार नववर्षाचे स्वागत

उत्साहात होणार नववर्षाचे स्वागत

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

हिंदू नववर्षाचा (Hindu New Year) पहिला दिवस गुढीपाडवा (Gudhipadwa), भारतीय संस्कृतीत चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस महापर्व म्हणून साजरा करण्याची परंपरानिमित्त यंदाही अंतर्नाद, महावादन, महारांगोळी व शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन आणि शस्त्र कलांचे सादरीकरण केले जाणार आहे.

- Advertisement -

गुढीपाडवा (Gudhipadwa) व हिंदू नववर्षाचे स्वागत पारंपरिक पद्धतीनेच करण्यासाठी दरवर्षी प्रमाणे यंदाही नववर्ष (New Year) स्वागतयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय विकास मंडळ (National Development Board) संचलित, नववर्ष स्वागत यात्रा समिती, नाशिक यांच्यातर्फे या हिंदू नववर्षाचे स्वागत ढोल-ताशांच्या गजरात आणि शोभायात्रांच्या जल्लोषात साजरे केले जाणार आहे.

शनिवार 18 मार्च रोजी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या शिवराज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण होत असून या निमित्ताने नाशिक जिल्ह्यातील (nashik district) सर्व ढोल पथकांचे एकत्रित ‘महावादन’ (1000 ढोलांचे समूह वादन, सायंकाळी 6 वाजता ) छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण केले जाणार आहे. रविवार 19 मार्च रोजी ‘पं. विष्णू दिगंबर पलुस्कर’ यांना समर्पित अंतर्नाद 1500 हून अधिक विद्यार्थ्यांचे (students) हिंदुस्थानी शास्त्रीय गायन, नृत्य, वादन कलेचे सादरीकरण, सायंकाळी 6 वाजता होणार आहे.

सोमवारी 20 मार्च रोजी पर्यावरण रक्षण (Environmental protection) या अंतर्गत ‘पंचमहाभूते’ या विषयाला अनुसरून महारांगोळी सकाळी 6 वाजेपासून काढली जाणार आहे. मंगळवार 21 मार्च रोजी ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन’ म्हणजेच ‘मृत्यंजय दिनानिमित्त’ तरुणांमध्ये स्वत्व जागरण करण्याच्या हेतूने ‘शिवकालीन शस्त्रविद्या व त्याचबरोबर भारतीय व्यायाम पद्धती’ ज्यामध्ये सूर्यनमस्कार, चंद्र नमस्कार, भूमिवंदन असे विविध ‘भारतीय व्यायाम आणि प्रात्याक्षिके’ सादर केली जाणार आहे, तसेच ‘शिवकालीन विविध प्रकारचे शस्त्रे’ आबालवृद्धांना जवळून बघता यावी व हाताळता यावी या उद्देशाने ‘शस्त्रात्रांची प्रदर्शनी’ मांडणार आहोत.

हे प्रात्यक्षिक सव्यसाची गुरुकुलाचे लखन जाधव आणि त्यांचे विद्यार्थी दाखवणार आहेत. बुधवार 22 मार्च रोजी शहरातल्या विविध भागातून सकाळी 7 वाजता शोभायात्रा होणार असून, पाडवा पटांगण (जुने भाजी पटांगण), गोदाघाट, पंचवटी , नाशिक याठिकाणी हे सर्व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. अंतर्नाद, महावादन व महारांगोळी या सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांची पूर्वतयारी पूर्ण होत आली असून यंदाही अधिकाधिक भव्य स्वरुपात या सर्व कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.

हा सण अधिक चांगल्या पद्धतीने आणि उत्साहाने साजरा करण्यासाठी नाशिककरांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आणि नववर्ष स्वागत यात्रा समिती, नाशिकचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती, उपाध्यक्ष राजेश दरगोडे, सचिव योगेश गर्गे व संघटक जयंत गायधनी यांनी केले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या