Wednesday, September 9, 2026
HomeनगरKarjat : विहिरीत आढळला नेपाळच्या युवकाचा मृतदेह

Karjat : विहिरीत आढळला नेपाळच्या युवकाचा मृतदेह

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

मिरजगाव परिसरातील हॉटेल यशराज शेजारी असलेल्या अशोक रामभाऊ खिल्लारे यांच्या विहिरीत एका युवकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गंगाराम राज नाथ (वय 26, मूळ रा. नेपाळ, हल्ली मुक्काम मिरजगाव) असे मृत युवकाचे नाव असून तो पूर्वी हॉटेल शिवम येथे आचारी कर्मचारी म्हणून काम करत होता. मिळालेल्या माहितीनुसार, अशोक रामभाऊ खिल्लारे विहिरीजवळ गेले असता त्यांना पाण्यात अर्धवट तरंगत असलेला मृतदेह दिसून आला. त्यांनी तात्काळ शेजारील हॉटेलमधील नागरिकांना बोलावून घटनेची माहिती दिली.

- Advertisement -

त्यानंतर जवळच असलेल्या हॉटेल शिवमचे मालक अभंग रूपचंद बोरुडे (रा. कोकणगाव, ता. कर्जत) हेही घटनास्थळी दाखल झाले. अभंग बोरुडे यांनी मृत युवकाची ओळख गंगाराम राज नाथ अशी पटवून दिली. गंगाराम हा त्यांच्या हॉटेलमध्ये कर्मचारी म्हणून काम करत होता; मात्र तो सुमारे तीन महिन्यांपूर्वी काम सोडून निघून गेला होता, अशी माहिती त्यांनी दिली. सदर घटनेची खबर सकाळी सुमारे 12.30 वाजण्याच्या दरम्यान पोलिसांना मिळाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास सुरू आहे.

ताज्या बातम्या

चौकशीसाठी आलेल्या पथकासमोरच प्राध्यापकाचा हृदयविकाराने मृत्यू

0
मालेगाव | प्रतिनिधी Malegaon येथील मुनिसिपल हायस्कूल व जूनियर कॉलेजमध्ये आज चौकशीसाठी आलेल्या शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यां समोर एका प्राध्यापकास सततच्या चौकशीचे मानसिक तणावाने कार्यालयातच...