Friday, November 22, 2024
Homeनगरविहीर महाघोटाळा : तीन गटविकास अधिकार्‍यांसह 21 जणांना नोटीस

विहीर महाघोटाळा : तीन गटविकास अधिकार्‍यांसह 21 जणांना नोटीस

एजंटांचे धाबे दणाणले, पाथर्डी-जामखेडमध्ये अनेकांची वळली बोबडी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

गेल्या काही महिन्यात पाथर्डी आणि जामखेड पंचायत समितीमधून पात्र नसलेल्या, तसेच बोगस लाभार्थी दाखवून ‘रोहयो’ योजनेतून विहिरींचा महाघोटाळा घातल्याचे समोर आले आहे. जिल्हास्तरावर झालेल्या प्राथमिक चौकशीत हा प्रकारसमोर आला आहे. याप्रकरणी जिल्हा परिषद प्रशासनाने जामखेडचे गटविकास अधिकारी, पाथर्डीचे दोन प्रभारी गट विकास अधिकारी अशा तीन अधिकार्‍यांसह दोन्ही तालुक्यांतील 21 ‘रोहयो’ कर्मचारी, लिपीक यांना नोटीस बजावली असल्याची माहिती हाती आली आहे.

- Advertisement -

दरम्यान, याप्रकरणी ‘सार्वमत’ने वृत्त प्रकाशीत करताच पाथर्डी- जामखेड तालुक्यासह संपूर्ण नगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तसेच विहिरींसह अन्य व्यक्तीगत लाभाच्या योजनांसाठी एजंटगिरी करणार्‍या टोळीमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून पाथर्डी – जामखेड तालुक्यातून पिळवणूक झालेल्या लाभार्थ्यांनी आता न्याय मिळेल म्हणून समाधान व्यक्त केले आहे. गेल्या महिनाभरापूर्वी पाथर्डी आणि जामखेड तालुक्यात ‘रोहयो’ तील विहिरीच्या प्रकरणाची चौकशी जिल्हा परिषद प्रशासनाने सुरू केली होती. या चौकशीत अनेक धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. या योजनेतील एका विहिरीसाठी चार लाखांचे अनुदान असून 700 ते 750 बोगस विहिरींच्या अनुदानाची रक्कम कोटींच्या घरात आहे.

हा प्रकार उघड झाल्याने या योजनेत मलीदा लाटणार्‍यांची नावे चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, प्रशासनाने जामखेडचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, पाथर्डीचे प्रभारी गटविकास अधिकारी जगदीश पालवे, आर. डी. गर्जे यांच्यासह जामखेडचे ‘रोहयो’चे 10 कंत्राटी आणि नियमित कर्मचारी, पाथर्डीचे 8 नियमित व कंत्राटी कर्मचारी अशा 21 जणांना नोटीस बजावत 10 दिवसात खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत. ‘रोहयो’तील विहीरी घोटाळ्याचे डफडे वाजताच जामखेड आणि पाथर्डी पंचायत समितीमध्ये अनेकांची बोबडी वळाली असल्याचे पहावयास मिळाले.

जिल्हा परिषदेतून मिळालेल्या माहितीनुसार आता जामखेड आणि पाथर्डी विहीर योजनेत घोटाळा करणार्‍यांची पाळेमुळे खोदण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पीडित शेतकर्‍यांनी तक्रार करण्यास पुढे यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या