Saturday, May 4, 2024
Homeदेश विदेशममता बॅनर्जींनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, ‘या’ विषयांवर झाली चर्चा

ममता बॅनर्जींनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, ‘या’ विषयांवर झाली चर्चा

नवी दिल्ली / New Delhi – पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (chief minister Mamata Banerjee) यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी ममतांनी पश्‍चिम बंगालमधील करोना स्थिती आणि लसीचा मुद्दा उपस्थित केला. बंगाल निवडणुकीनंतर पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) आणि ममता बॅनर्जी यांची नवी दिल्ली येथे ही पहिली बैठक होती.

पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, आज पंतप्रधानांसोबत शिष्टाचार बैठक झाली. या बैठकीत मी राज्यातील कोरोना स्थिती आणि अधिक लसी तसेच औषधांचा मुद्दा उपस्थित केला. याच बरोबर मी प्रलंबित असलेला राज्याचे नाव बदलण्याचा मुद्दाही उपस्थित केला.

- Advertisement -

ममता बॅनर्जी म्हणाल्यात आहेत की, पश्‍चिम बंगालचे (West Bengal) नाव बदलण्याबाबतही चर्चा झाली आहे. यावर पंतप्रधान काय म्हणाले असं पत्रकारांनी त्यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, पंतप्रधान काय म्हणाले, हे सांगणे योग्य ठरणार नाही. मात्र ते म्हणाले आहेत की, आम्ही पाहू.

- Advertisment -

ताज्या बातम्या