Monday, November 25, 2024
Homeक्रीडावेस्ट इंडिज महिला क्रिकेट संघाची कर्णधार स्टेफनी टेलरचा खास विक्रम

वेस्ट इंडिज महिला क्रिकेट संघाची कर्णधार स्टेफनी टेलरचा खास विक्रम

दिल्ली | Delhi

बुधवारी इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज महिला संघात T20 मालिकेतील दूसरा झाला. या सामन्यात इंग्लंडने ४७ धावांनी विजय मिळवला. यासह ५ सामन्यांचा T20 मालिकेत इंग्लंडने २-० ने आघाडी मिळवली आहे. या सामन्यात पराभूत झालेल्या वेस्ट इंडिज संघाची कर्णधार स्टेफनी टेलरने (Stefanie Taylor) एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे.

- Advertisement -

टेलरने या सामन्यात ३१ चेंडूत २८ धावा केल्या. यात तिच्या ४ चौकारांचा समावेश होता. यासह तिने आंतरराष्ट्रीय T20 कारकिर्दीतील आपल्या ३००० धावा पूर्ण केल्या आहेत. हा विक्रम करणारी ती आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेट इतिहासातील दूसरीच खेळाडू ठरली. तिच्याआधी आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये ३००० धावा पूर्ण करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत न्यूझीलंडची महिला अष्टपैलू खेळाडू सूझी बेट्स अव्वल क्रमांकावर आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक २७९४ धावा केल्या आहेत.

स्टेफनी टेलरने जून २००८मध्ये आयर्लंड महिला संघाविरुद्धच्या सामन्यातून T20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून टेलरने एकूण १०५ सामने खेळले आहेत. त्यात तिने १०३ डावात फलंदाजी करताना ३०२० धावा केल्या आहेत. यात तिच्या २१ अर्धशतकांचा समावेश आहे. तर आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये तिची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ९० इतकी आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या