भारतीय स्वयंपाकघरात लाटण्याचा वापर पोळी, पुरी आणि पराठ्यांसाठी केला जातो, काही घरात बायका हे नवर्यावरही उगारत असतील, परंतु तुम्हाला माहित आहे का?छोटे दिसणारे लाटणे घरात सुख-समृद्धी टिकवून ठेवते. वास्तूनुसार, खरेदी करताना आणि वापरताना काही गोष्टींकडे दुर्लक्ष न केल्यास तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो, त्यामुळे काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी.
आपण ज्या घरात राहतो, ते नीटनेटके ठेवण्यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील असतो. कोणत्याही घरातील महत्त्वाची जागा म्हणजे स्वयंपाकघर वा आधुनिक भाषेतील किचन. स्वयंपाकघर हे लक्ष्मीचे स्थान मानले जाते. ज्योतिष आणि वास्तुशास्त्रातही स्वयंपाकघराला महत्त्वाचे मानले गेले आहे. काही लहान सहान गोष्टींकडे आपण लक्ष देत नाही. मात्र, पूर्वजांनी योग्य तर्क, शास्त्र आणि नेमक्या आधारावर त्या सांगितलेल्या असतात. स्वयंपाकघरात वापरण्यात येणारे लाटणे हे लहान आणि तुम्हाला अगदी साधे वाटत असेल तरी ही छोटीशी गोष्ट तुम्हाला नुकसानदायक ठरू शकते.
पोळपाट आणि लाटण्यासंबंधी वास्तू नियम :
आपल्या घरातील अनेक गोष्टी या आपल्याला फायदा मिळवून देणार्या ठरू शकतात. वास्तु विज्ञान शास्त्रात याची माहिती देण्यात आली आहे. वास्तूदोष काढण्यासाठीदेखील आपल्या घरातील गॅस शेगडीपासून, बेसिनमधील नळापर्यंत अनेक गोष्टी आपल्या उपयोगी पडू शकतात. यामुळे आपल्या घरात सुख, शांतता, समृद्धी, आनंद, समाधान, सकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात येऊ शकते.
दररोज वापरात असणार्या पोळपाट-लाटणे यांबाबत वास्तू विज्ञान काय सांगते? जाणून घेऊया
भारतीय स्वयंपाकघरात लाटण्याचा वापर पोळी, पुरी आणि पराठ्यांसाठी केला जातो, तुम्हाला माहित आहे का? की हे छोटे दिसणारे लाटणे घरात सुख-समृद्धी टिकवून ठेवते. वास्तूनुसार, खरेदी करताना आणि वापरताना काही गोष्टींकडे दुर्लक्ष न केल्यास तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो, त्यामुळे काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी. जर तुम्ही नवीन लाटणे खरेदी करत असाल तर वार महत्वाचा ठरतो, त्यामुळे विशेष काळजी घ्या आणि मंगळवार आणि शनिवारी चुकूनही लाटणे खरेदी करू नका. तुम्ही या दोन दिवसांशिवाय कोणत्याही दिवशी लाटणे खरेदी करू शकता, बुधवार हा दिवस लाकडी किंवा दगडी पोळपाट-लाटणे खरेदी करण्यासाठी अत्यंत शुभ आहे, असे या शास्त्रात म्हटले आहे. कधी कधी घाईघाईत आपण पोळपाट आणि लाटणे कसेही ठेवून देतो. परंतू कधीही ते उलटे ठेवू नका. यामुळे वास्तू दोष वाढतात. तसेच कधीही लाटणे आपटून किंवा पटकून ठेवू नका.
वास्तुशास्त्रानुसार असे म्हणतात की पीठ किंवा तांदळाच्या डब्यावर पोळपाट आणि लाटणे कधीही ठेवू नका. असे करणे देखील अशुभ मानले जाते. रात्री झोपण्यापूर्वी लाटणे धुवा. न धुता पोळपाट लाटणे वापरल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होतो. नेहमी पोळपाट लाटणे अशा प्रकारे खरेदी करा की त्यांचा आवाज येणार नाही. त्यांच्या आवाजामुळे घरात अशांततेचे वातावरण राहते. जर लाटणे तुटलेले असेल तर ते ताबडतोब घरातून काढून टाका. जर असे केले नाही तर यामुळे गरिबीला प्रोत्साहन मिळते आणि धनहानी होण्याची शक्यता असते.