Friday, November 22, 2024
Homeब्लॉगहोमिओपॅथीचे काय आहेत समज-गैरसमज?; जाणून घ्या

होमिओपॅथीचे काय आहेत समज-गैरसमज?; जाणून घ्या

जागतिक होमिओपॅथी दिवस (World Homeopathy Day) हा १० एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो. हा दिवस वैद्यकीय क्षेत्रातील होमिओपॅथीचे महत्त्व आणि योगदान दर्शवणारा आहे…

होमिओपॅथीचे संशोधक व संस्थापक डॉक्टर ख्रिश्चन फ्रेडरिक सॅम्युअल हॅनेमन यांचा जन्म १० एप्रिल १७५५ रोजी पॅरिस येथे झाला म्हणून हा दिवस त्यांना कृतज्ञता व मानवंदना दर्शविण्यासाठी साजरा केला जातो. आज होमिओपॅथी उदयास येऊन २२६ वर्ष झाले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे फक्त २२६ वर्षे जुनी पॅथी आज जगात दोन नंबरला गणली जाते. तरीसुद्धा सामान्य लोकांमध्ये होमिओपॅथीबद्दल खूप सारे समज-गैरसमज आहेत. आज त्यावर थोडासा प्रकाश टाकण्याचा छोटासा प्रयत्न………..

- Advertisement -

गैरसमज- होमिओपॅथी औषधांसोबत दुसऱ्या पॅथीची औषधी घेऊ शकत नाही ? उत्तर- आपली औषधी आणि पारंपरिक औषधी दोन्ही एकाच वेळी घेतली जातात. पारंपरिक औषधी ही अधिक रसायनांवर आधारित असतात तर होमिओपॅथिक औषधी ही वनस्पती, खनिजे, प्राणी उत्पादने यांसारख्या नैसर्गिक संसाधनांवर आधारित असतात.

दोघांच्या कृतीच्या पद्धती वेगळ्या आहेत आणि ते एकमेकात अडथळा आणत नाही. मधुमेह, बीपी, यांसारख्या आजारांवरचे औषधे आपण अचानक थांबू शकत नाही पण उपचार नियमित ठेवून आपण त्यांचा डोस हळूहळू कमी करू शकतो. जसे तुमचा मधुमेह किंवा बीपी आटोक्यात येईल, तसे पारंपरिक औषधांचा डोस कमी होईल.

गैरसमज : होमिओपॅथी आजारावर उपचार करत नाही तर फक्त लक्षणांवरून उपचार करते.

उत्तर : होमिओपॅथी केवळ लक्षणांवर उपचार करत नाही तर रोगाचे मूळ कारण काढून टाकते आणि म्हणूनच आजार कायमचा बरा करते. लक्षणांवरून कुठल्याही आजाराचे तंतोतंत निदान करता येते. रक्त, लघवी, सोनोग्राफी किंवा तत्सम मॉडर्न तपासण्यांवरून आजाराच्या निदानावर शिक्कामोर्तब होते.

गैरसमज : होमिओपॅथी औषधांसोबत कच्चा कांदा, लसूण, कॉफी घेऊ शकत नाही.

उत्तर : होमिओपॅथिक औषधांसोबत तुम्ही कुठलेही पथ्य न पाळता ही औषधी सुरक्षितपणे घेऊ शकतात. कच्चा कांदा, लसूण खाल्ल्याने आपल्या तोंडात बराच काळ त्याचा उग्र वास असतो. त्या उग्र वासाने होमिओपॅथिक औषधे निष्क्रिय होतात. तसेच कॉफी सुद्धा बरीच होमिओपॅथिक औषधांची कार्यक्षमता निष्क्रिय करते. तुम्ही होमिओपॅथिक औषधांसोबत कच्चा कांदा लसूण किंवा कॉफी घेऊ शकता की नाही हे संबंधित डॉक्टर तुम्हाला चालू असलेल्या होमिओपॅथिक औषधी बघून सांगू शकतो.

गैरसमज : होमिओपॅथिक औषधी व्यसनाधीन आहेत व ती ही दीर्घकाळासाठी घेणे सुरक्षित नाही.

उत्तर : होमिओपॅथिक औषधे व्यसनाधीन नाही व दीर्घकाळ घेण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे. असंख्य जनसमुदाय बालपणापासून तर उतार वयापर्यंत आयुष्यभर होमिओपॅथिक औषधी उपचार करतात म्हणून त्यांचे वयोमान वाढते व रोग प्रतिकारशक्ती उंचावते.

गैरसमज : होमिओपॅथिक औषधांमध्ये स्टिरॉइड्स असते का ?

उत्तर : होमिओपॅथिक औषधांमध्ये स्टिरॉइड्स नसतात. ही औषधे पूर्णतः नैसर्गिक असतात. होमिओपॅथिक औषधे कुठल्याही टेस्टिंग लॅबमध्ये तुम्ही टेस्ट करून खात्री करू शकतात.

गैरसमज : होमिओपॅथिक औषधी गर्भवती महिला घेऊ शकत नाही.

उत्तर : होमिओपॅथिक औषधे अतिशय सुरक्षित आणि प्रभावी आहेत. यांचे कोणतेही ज्ञात दुष्परिणाम नाहीत आणि गर्भवती महिला व बाळांसाठी ही औषधी सुरक्षित आहेत. गर्भधारणेदरम्यान होमिओपॅथीद्वारे सामान्यपणे आणि यशस्वीरीत्या उपचार केले जातात. गर्भपात, मळमळ, उलट्या, अशक्तपणा, कुपोषण, भावनिक समस्या, डोकेदुखी, थकवा, मुळव्याध, उच्च रक्तदाब, सूज येणे असे प्रत्यक्षात बरेच लक्षणे होमिओपॅथीने बरे करता येतात, गर्भधारणेत येणाऱ्या अडथळ्यांवर सुद्धा या औषधांनी यशस्वी मात करता येते. प्रस्तुतीच्या उपचारानंतर, बाळांतपणात येणाऱ्या अडथळ्यांवर होमिओपॅथिक औषधे मात करतात. एवढेच नाही तर गर्भावस्थेत दिलेल्या होमिओपॅथिक उपचारांमुळे काही अनुवंशिक आजार प्रतिबंध किंवा बरे करायला ही मदत करू शकतात.

गैरसमज : होमिओपॅथिक औषधी लहान बाळ घेऊ शकत नाही.

उत्तर : होमिओपॅथिक औषधी मुख्यतः बाळाच्या रोगप्रतिकारशक्तीला उत्तेजन देण्याचे प्रयत्न करते, ज्याने बिना काही दुष्परिणाम व कुठल्याही पथ्याशिवाय लहान बाळांचे विकार कायमचे बरे करता येतात. लहान मुलांनाही औषधी देणे सोपे आहे, कारण बहुतेक औषधे गोड गोळ्या, लहान गोळ्या किंवा पावडरच्या स्वरूपात येतात. एक दिवसाच्या बाळापासून सुद्धा तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार होमिओपॅथिक औषधे देता येतात. वारंवार ताप, सर्दी, खोकला, दमा, ॲलर्जी अंथरुणात लघवी करणे इत्यादी समस्यांसाठी होमिओपॅथी नक्की मदत करते.

गैरसमज : ॲक्युट डिसीजेस (कमी कालावधीचा रोग) जसे डेंग्यू, चिकनगुनिया, ताप, ॲलर्जी, मलेरिया, सर्दी, खोकला यांमध्ये होमिओपॅथी काम करीत नाही.

उत्तर : ॲक्युट डिसीजेस जसे सर्दी, ताप, खोकला, डेंग्यू, टायफाईड, मलेरिया अशा कमी कालावधीचा रोगांसाठी होमिओपॅथीच्या औषधांना लगेच गुण येतो. या आजारात दिली जाणारी औषधी शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवून लगेच बरे करते. सध्याच्या जगात चिंतेचा विषय असणाऱ्या कोविड १९ वर सुद्धा होमिओपॅथी गुणकारी ठरली.

संजीवनी होमिओपॅथीने जवळजवळ दोन हजारपेक्षा जास्त रुग्णांना घरी ठेवून केवळ होमिओपॅथी औषधांनी बरे केले आहेत. यामध्ये आश्चर्यकारक चार ते पाच दिवसांतच बरे होण्याची लक्षणे दिसून आले आहेत. तसेच ज्या रुग्णांना मधुमेह, दमा, रक्तदाब अशा तक्रारी होत्या त्यांना सुद्धा अत्यंत गुणकारी परिणाम दिसून आहेत, तेही दहा ते चौदा दिवसातच पूर्ण बरे झालेत. तसेच चिकनगुनियानंतर होणाऱ्या सांधेदुखीवरीही प्रभाव दिसला आहे.

जे लोक मॉडर्न औषधी या आजारावर घेतात ते लोक या लक्षणांना महिन्यापासून तर काही वर्षापर्यंत सांधेदुखीला सामोरे जातात. पण जे रुग्ण होमिओपॅथी औषधी घेतात त्यांना अगदी चोवीस तासांतच परिणाम दिसण्यास व पूर्ण बरे होण्यास मदत होते कारण होमिओपॅथी रोगाचे समूळ उच्चाटन करते. अजून रोगांना मुळासकट बरे करण्यापलीकडे ही होमिओपॅथी प्रतिबंधात्मक सुद्धा चांगले परिणाम दाखवतात.

आम्ही कोविडच्या काळात प्रतिबंधात्मक जवळजवळ आठ लाख मोफत इम्युनिटी बूस्टर लोकांपर्यंत पोहोचवले. ज्या लोकांनी ही औषधे घेतली त्यांना कोविडचा संसर्ग झाला नाही व ज्यांना झाला त्यांच्यामध्ये लवकर फरक दिसून आला. खालील आजारांवर होमिओपॅथी उपचाराने कायमचे समूळ उच्चाटन केले जाऊ शकते.

लहान मुलांचे आजार

किरकिर करणे, हट्टीपणा, सर्दी, ताप, खोकला, बालदमा, ॲलर्जीचे विकार, अंथरुणात लघवी करणे, – स्त्रियांचे आजारः स्त्रियांच्या गर्भाशयाच्या तक्रारी, मासिक पाळीच्या तक्रारी, रजोनिवृत्तीच्या तक्रारी, पीसीओडी, हार्मोनल बिघाड, पांढरे पाणी, वंधत्व इत्यादी.

केसांच्या समस्या

केस पांढरे होणे, गळणे, कोंडा होणे, चाई अथवा उंदरी लागणे.

मानसिक आजार

दडपण, अनामिक भीती, निद्रानाश, काळजी इत्यादी.

त्वचेचे विकार

सोरियासिस, इसब, पांढरे डाग लायकन प्लॅनस, चिखल्या, चेहऱ्यावरील पिंपल्स, जळवात, एलर्जी, कुरूप, नागिन, पित्त सभरणे, इत्यादी.

किडनीचे विकार

मुतखडा, वारंवार लघवीचे विकार, प्रोस्टेट ग्रंथीचे विकार, अॅक्युट और कोनिक रिनल फेल्युलर, इत्यादी. – पोटाचे विकार: ऍसिडिटी, अपचन, आय. बी. एस., बद्धकोष्टता, अतिसार, मळमळ, उलटी, पित्ताशयातील खडे, कावीळ, इत्यादी.

संधिवात, गाऊट (यूरिक ऑसड वाढणे).

मुळव्याध, भगंदर, नासरू.

सिएटिका, हातापायांना मुंग्या येणे.

डोकेदुखी, थायरॉईडचे विकार, मधुमेह, रक्तदाबाच्या तक्रारी, मणक्यांचे व मेंदूचे विकार, कान-नाक-घस्याचे विकार, वारंवार तोंड येणे, गुप्तरोग व लैंगिक समस्या, वांझपणा इत्यादी.

तर काहीही झाले तरी घाबरू नका. आपणा सर्वांसोबत आहेत डॉ. घोंगडेज संजीवनी होमिओपॅथी. जागतिक होमिओपॅथी दिनाच्या निरोगी शुभेच्छा.

डॉ. योगेश घोंगडे, एम. डी. (होमिओपॅथी), गोल्ड मेडलिस्ट शरणपूर रोड, नाशिक रोड, पंचवटी, कळवण, धुळे मोबाईल नं. ८२७५८५४२५ [१२]

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या