Saturday, May 18, 2024
Homeभविष्यवेधघरात कोणत्या रंगाचे पडदे आहेत?

घरात कोणत्या रंगाचे पडदे आहेत?

खोलीच्या रंगानुसार, आजकाल खिडक्यांवर पडदे दिसून येतात. मात्र वास्तूचे नियम लक्षात घेऊन, घराची सजावट केली तर नागरिक लोक भाग्यवान ठरू शकतात. पडदे हा घराचा महत्त्वाचा भाग आहे. वास्तूप्रमाणे, घरामध्ये पडदे लावले तर ते तुमचे नशीब उजळू शकतं. चला जाणून घेऊया कोणत्या रंगाचे पडदे घरामध्ये चांगले परिणाम देतात.

बेडरूम – वास्तूनुसार बेडरूममध्ये केशरी, गुलाबी किंवा निळे पडदे लावा. यामुळे पती-पत्नीचे नाते घट्ट राहते. निळ्या रंगाच्या प्रभावामुळे संयम देखील विकसित होतो. आपण गुलाबी पडदे देखील लावू शकता, यामुळे मनःशांती येते, नात्यात गोडवा येतो. हिरवा तसंच निळा रंग हे शांती आणि आरोग्याचे प्रतीक मानलं जातात. त्यामुळे मुलांच्या खोलीत हलक्या निळ्या किंवा हिरव्या रंगाचे पडदे लावावेत.

- Advertisement -

स्वयंपाक घर – घराच्या जेवणाच्या जागेच्या खिडक्या आणि दारांवर हलके किंवा तपकिरी रंगाचे पडदे लावावे. असे रंग शुभ मानले जातात. निळे पडदे आराम आणणारे मानले जातात.

देवघर – पिवळा रंग शहाणपण, तपस्या आणि अध्यात्म यांचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे पूजाघरात याचा वापर करणं शुभ मानलं जातं. घराच्या मंदिरात हलके केशरी पडदेही लावू शकता. हे दोन्ही रंग पवित्रतेचं प्रतीक असतात.

पडद्यांची दिशा – दक्षिण दिशेला खिडकी किंवा दरवाजा असेल तर या ठिकाणी लाल, गडद हिरवा रंग वापरता येऊ शकतो. घराच्या पूर्व दिशेला हिरवे रंगाचे पडदे शुभ मानलं जातं. हिरवा रंग सकारात्मकतेच्या उर्जेचं प्रतीक आहे. हा रंग शरीरातील मज्जासंस्था मजबूत करण्यासंही मदत कर

- Advertisment -

ताज्या बातम्या