दिवसाला एकूण 8 प्रहर असतात. यात दिवसाला 4 व रात्रीचे 4 प्रहर असतात. यात दिवा लावायची वेळ महत्त्वपूर्ण मुख्यत: त्या दोन असतात सायंकाळ आणि कातरवेळ पण या दोघांमध्ये फरक असते. दिवसाचा चौथा प्रहर हा सायंकाळ असतो जो 4 ते 7 वाजे पर्यत असतो त्यानंतर पुढे प्रदोष चालू होतो. सूर्य अस्ताची वेळ आणि सूर्य पूर्ण अस्त झाल्यावर सायंकाळ व प्रदोष चालू होण्याची मधली वेळ हीच कातरवेळ असते. जी सध्या 6.45 ते 7.30 आहे. आणि हीच वेळ दिवा लावण्यासाठी योग्य सांगितली गेली आहे म्हणून आपले पूर्वज म्हणायचे 7 च्या आत घरात. सकाळी सूर्योदयापूर्वी आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर 48 मिनिटांच्या (दोन घटिकांच्या) काळाला संधीकाल, असे म्हणतात. संधीकाल हा वाईट शक्तींच्या आगमनाचा काळ.
दिवे का लावावेत ?
दिवे लावणे म्हणजे अग्निस आवाहन करणे. सूर्य मावळल्यानंतर, वातावरणातील प्रकाश व ऊर्जा दोन्ही कमी होते. यामुळे जे जीवजंतू सूर्यप्रकाशात टिकू शकत नाहीत असे जीव वातावरणात लगेच पसरतात. शरिरात प्रवेश करू शकतात व आरोग्य बिघडवू शकतात. वातावरणात सुक्ष्मजीव असतात त्यांना आळा घालण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते, सूर्य मावळल्यानंतर ती ऊर्जा, सर्वत्र दिवे लावून मिळवता येते. म्हणून दिवे लावावेत. तसेच प्रकाशाचीही कमतरता भरुन निघते.
ही वेळ अत्यंत महत्त्वपूर्ण बर्याचदा वाईट शक्तींचा त्रास हा तिन्ही सांजेच्यावेळी सर्वांत जास्त प्रमाणात होतो. अघोरी विद्येचे उपासक तिन्हीसांजेच्या वेळी वातावरणाच्या कक्षेत प्रवेश करणार्या वाईट शक्तींना नियंत्रणात घेऊन त्यांच्याकडून वाईट कृत्ये करवून घेतात. म्हणून तिन्हीसांजेच्या वेळीच मोठ्या प्रमाणावर अपघात, हत्या होतात किंवा बलात्काराची कृत्ये घडून येतात. या काळाला कातरवेळ म्हणजेच त्रासदायक किंवा विनाशाची वेळ, असे म्हणतात.
तिन्ही सांजेच्यावेळी वातावरणात वाईट शक्तींचे प्राबल्य अधिक असते. त्यामुळे वायूमंडलातील या वाईट शक्ती मुलांचे मन आणि बुद्धी यांवर आक्रमण करण्याची शक्यता अधिक असते. वायूमंडलात कार्यरत असणार्या वाईट शक्ती रात्रीच्या काळात मुलांच्या मनात भय (भीती) निर्माण करतात. तिन्हीसांजेच्या वेळी दिवा लावून शुभं करोति व संध्या प्रार्थना म्हटल्यामुळे देहाभोवती व घराभोवती संरक्षक-कवच निर्माण होऊन वाईट शक्तींपासून रक्षण होते. तसेच देवाच्या आशीर्वादामुळे देहात कार्यरत असणारी शक्तीची स्पंदने 12 तास सूर्योदयापर्यंत सूक्ष्मातून कार्यरत राहतात व मुलांच्या मनातील भीती दूर होऊन त्यांना देवाशी अनुसंधान साधता येते. तसेच मुलांमध्ये क्षात्रवृत्ती वाढण्यास साहाय्य होते.
असे म्हणतात दिवा लावल्यावर कुलदेवता, ग्रामदेवता ह्या राखणदारासोबत फेरफटका मारतात व ज्या घरात दिवाबत्ती लावली जाते तेथे वास करतात व घरातील व्यक्तींना व घराला वाईट स्पंदनांपासून संरक्षण करतात तसेच कातरवेळ होताच ईशान्य दिशेकडून लक्ष्मी घुबडावर बसून येते व अनेक रुप धारण करुन जेथे दिवा लावणी होते त्या घरात प्रवेश करते म्हणून तर घुबड पक्षी हा सुद्धा कातरवेळीच बाहेर पडतो. कातरवेळी घुबड दिसला की समजून जायचे लक्ष्मी आजूबाजूला अदृश्य रुपाने वावरत आहे. तुळस आणि लक्ष्मी दोघी एकमेकांच्या सखी आहेत त्या कातारवेळी एकमेकींशी गप्पा मारतात म्हणून कातरवेळी तुळशी जवळ दिवा लावला जातो.
संध्याकाळी 6.30 नंतर केव्हाही दिवा लावावा, दिवा लावल्यावर घरातील सुवासींनीने दिवा लावला की घराचे मुख्य दार उघडून हातात हळद कुंकू घेऊन थांबावे व कुलदेवता, ग्रामदेवता, लक्ष्मीला घरात येण्यासाठी आमंत्रण द्यावे आणि उंबरठ्यावर हळद कुंकू वहावे. देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावून देव अन् दिवा यांना नमस्कार करावा.
कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती ?

ताज्या बातम्या
Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...
नाशिक | Nashik
महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...